उष्णता वाढल्यानंतर शरीराला थंडाव्याची आवश्यकता असते. अशावेळी उष्ण किंवा पचनास जड असलेल्या पदार्थांचे सेवन करू नये. या दिवसांमध्ये शरीराला पचन होईल असेच पदार्थ खावेत. उष्णता वाढल्यानंतर शरीराला हानी पोहचते. त्यामुळे दुपारच्या आहारात नेहमी पौष्टिक आणि हेल्दी पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला उन्हाळाच्या दिवसांमध्ये दुपारच्या आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होऊन आणि शरीर फ्रेश, ताजेतवटवीत दिसते. (फोटो सौजन्य – iStock)
उन्हाळ्यात दुपारच्या आहारात करा 'या' हेल्दी पदार्थांचे सेवन
उन्हाळ्यात चिया सीड्सचे जास्त सेवन केले जाते. पाण्यामध्ये लिंबू आणि चिया सीड्स टाकून भिजत ठेवलेल्या पाण्याचे सेवन केल्यास शरीरातील उष्णता कमी होईल.
सकाळच्या नाश्त्यात किंवा दुपारी उन्हात बाहेर जाऊन आल्यानंतर कोलड्रिंक्सचे सेवन करण्याऐवजी फळांच्या रसाचे किंवा नारळ पाण्याचे सेवन करावे. नारळ पाणी शरीर थंड ठेवते.
दुपारच्या आहारात फळे आणि काजूचे सेवन केल्यामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होते. काजू पचनास अतिशय हलके असतात. फळांमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळून येतात.
उन्हाळ्यात दही भात खाणे शरीरासाठी अतिशय गुणकारी आहे. दही खाल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते आणि शरीरात थंडावा कायम तसाच राहतो. दही किंवा ताकाचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया निरोगी राहते.
सकाळच्या नाश्त्यात किंवा दुपारच्या आहारात भाज्यांचे सॅलड खावे. भाज्यांमध्ये असलेले आवश्यक घटक शरीरासाठी गुणकारी ठरतात. सॅलड बनवताना तुम्ही काकडी, गाजर, टोमॅटो इत्यादी भाज्यांचे अधिक सेवन करू शकता.