दैनंदिन आहारात सतत तेलकट तिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्यास सुरुवात होते. शरीरात साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. यामुळे शरीराच्या रक्तवाहिन्यांमध्ये चिकट थर जमा होण्यास सुरुवात होते. त्यामुळे रोजच्या आहारात कमी तिखट, तेलकट आणि मसालेदार पदार्थांचे सेवन करावे. कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर हार्ट अटॅक किंवा इतर आरोग्यासंबंधित समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित कोणत्या पेयांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – iStock)
रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी नियमित करा 'या' रसांचे सेवन
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित मेथी दाण्यांचे पाणी प्यावे. मेथीच्या दाण्यांमध्ये असलेले फायबर शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करतो.
आवळ्याच्या रसात मोठ्या प्रमाणात विटामिन सी आढळून येते. सकाळी रिकाम्या पोटी ताज्या आवळ्याचा रस प्यायल्यास शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होण्यासोबतच रोगप्रतिकारशक्ती सुद्धा निरोगी राहील.
ग्रीन टी मध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आढळून येतात, ज्यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते आणि आरोग्य सुधारते. ग्रीन टी प्यायल्यामुळे हृद्यासंबंधित समस्या उद्भवत नाहीत.
जेवणातील पदार्थ बनवताना टोमॅटोचा वापर केला जातो. शरीरातील लिपिड्सची पातळी वाढवण्यासाठी नियमित टोमॅटोचे सेवन करावे. याशिवाय तुम्ही टोमॅटोचा रस सुद्धा पिऊ शकता.
लसूण पाकळ्यांचे पाणी आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. यामध्ये अॅलिसिन नावाचा घटक आढळून येतो. ज्यामुळे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊन जाते.