हल्ली चुकीच्या जीवनशैलीमुळे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांना मधुमेह होत आहे. मधुमेह झाल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागते आणि आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. या लक्षणांकडे योग्य वेळी लक्ष न दिल्यास शरीरातील इतर अवयवांना इजा पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरात मधुमेहाची लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे. आज आम्ही तुम्हाला मधुमेह झाल्यानंतर आहारात कोणत्या फळाचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – iStock)
मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी दैनंदिन आहारात करा 'या' स्वस्त फळाचे सेवन
मधुमेह झाल्यानंतर आहारात जर्दाळूचे सेवन करावे. यामध्ये जीवनसत्त्वे अ, क, फायबर, पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळून येतात.
रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर नियमित एक जर्दाळू खावे. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहील आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल.
वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात जर्दाळूचे सेवन करावे. यामुळे शरीरावर वाढलेली अतिरिक्त चरबी कमी होते आणि वजन नियंत्रणात राहते.
मधुमेह झाल्यानंतर हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक यासारख्या समस्या उद्भवू शकता. या समस्या उद्भवू नये म्हणून आहारात कमी साखर युक्त पदार्थांचे सेवन करावे. उपाशी पोटी जर्दाळूचे सेवन केल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहील.
जर्दाळू खाल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. दैनंदिन आहारात जर्दाळूचे सेवन केल्यामुळे बिघडलेली पचनक्रिया सुधारते आणि आरोग्याला फायदे होतात.