उन्हाळा सुरु झाल्यानंतर सगळ्यात आधी कलिंगड या फळाची आठवण सगळ्यांचं येते. कलिंगड खाणे सगळ्यांचं खूप आवडते. यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ऊन वाढल्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ लागते. पाणी कमी झाल्यानंतर आरोग्याला हानी पोहचू शकते. त्यामुळे उन्हाळ्यात भरपूर पाण्याचे सेवन करावे. याशिवाय पाणीदार फळांचे सेवन करावे. कलिंगडमध्ये असलेले घटक आरोग्यासोबतच त्वचेसाठी सुद्धा अतिशय प्रभावी आहेत. आज आम्ही तुम्हाला कलिंगड खाल्यामुळे आरोग्यला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
डिहायड्रेशनच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी उन्हाळ्यात करा 'या' फळाचे सेवन
कलिंगडमध्ये अतिशय कमी कॅलरीज असतात. त्यामुळे वाढलेले वजन कमी करताना तुम्ही नियमित या फळाचे सेवन करू शकता. कलिंगड खाण्यासोबतच तुम्ही कलिंगड ज्युस किंवा सॅलड इत्यादी पदार्थांचे सेवन करणे फायदेशीर ठरेल.
कलिंगडमध्ये ९२ टक्के पाणी असते. यामुळे शरीर हायड्रेट राहते. कलिंगडचे नियमित सेवन केल्यास बिघडलेली पचनक्रिया निरोगी राहील. तसेच पोटावर साचून राहिलेली अतिरिक्त चरबी कमी होईल.
कलिंगडमध्ये असलेल्या नैसर्गिक साखरेमुळे शरीराचे कोणतेही नुकसान होत नाही. कारण यामध्ये कमी कॅलरीज असतात. गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही कलिंगडचे सेवन करू शकता.
लाइकोपीन, विटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स घटकांनी समृद्ध असलेले कलिंगड शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करते. याशिवाय शरीरात होणारी जळजळ सुद्धा कमी होते.
व्यायाम केल्यानंतर किंवा बाहेर जाऊन आल्यानंतर कलिंगडचे सेवन करावे. कारण यामध्ये असलेल्या नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स आणि पाण्यामुळे शरीराला ताजेतवाने वाटते.