pcos च्या समस्येने अनेक महिला त्रस्त आहेत. मासिक पाळी अनियमित झाल्यानंतर मासिक पाळीच्या चक्रामध्ये बदल होतो आणि आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. पीसीओसची समस्या उद्भवू लागल्यानंतर अचानक वजन वाढणे, मासिक पाळीमध्ये अडथळा निर्माण होणे. हार्मोन्सचे असंतुलन इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी दैनंदिन आहारात या गुणकारी पेयांचे सेवन करावे. यामुळे आरोग्यासंबंधित इतरही समस्या दूर होतात.(फोटो सौजन्य – iStock)
PCOS च्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी 'या' हर्बल ड्रिंकचे करा सेवन
आलं आणि दालचिनी टाकून तयार केलेल्या पाण्याचे सेवन केल्यामुळे पीसीओसच्या समस्येपासून आरोग्यासंबंधित अनेकां समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.
नियमित रात्री झोपताना हळदीच्या दुधाचे सेवन करावे. हळदीचे दूध अनेक आजारांवर औषधी आहे. या दुधात आढळून येणारे क्युमिन आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामध्ये दाहक-विरोधी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळून येतात.
कोरफडच्या रसाचे सेवन केल्यामुळे शरीरातील हानिकारक घटक पडून जातात आणि शरीर सुधारण्यास मदत होते. पीसीओएसमुळे होणारी जळजळ कमी करण्यास नियमित कोरफडच्या रसाचे सेवन करावे.
तुळशीच्या पानांचा वापर करून बनवलेली चहा प्यायल्यामुळे मासिक पाळीच्या वेदना कमी होतात. तसेच हार्मोन्सचे संतुलन राखण्यासाठी मदत होते.
मेथी दाण्यांमध्ये दाहक-विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे शरीरातील इन्सुलिनची संवेदनशीलता आणखीनच वाढतं जाते. अनियमित मासिक पाळीच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी मेथी दाण्यांचे पाणी प्यावे.