फळांचा राजा म्हणून आंब्याची सगळीकडे ओळख आहे. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आंबा खायला खूप आवडतो. आंब्याचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. पिकलेला हापूस आंबा पाहिल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. जगभरात सगळीकडे कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला आंब्याचे सेवन केल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. त्यामुळे वाढत्या उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी नियमित आंबा खावा. (फोटो सौजन्य – iStock)
चविष्ट रसाळ आंब्याचे सेवन केल्यामुळे शरीराला होतात 'हे' गुणकारी फायदे
आंब्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येते. फायबरयुक्त आंब्याचे सेवन केल्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. वाढलेले वजन कमी करताना आंब्याचे सेवन केल्यास लवकर भूक लागणार नाही.
आंब्यामध्ये फायबर,पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात. शरीरात वाढलेली कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आंब्याचे सेवन करावे.
पोटातील आतड्यांचे कार्य निरोगी राहण्यासाठी राहण्यासाठी आंब्याचे सेवन करावे. आंबा खाल्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. याशिवाय यामध्ये अमायलेज सारखे एंजाइम आढळून येतात.
त्वचा आणि केसांचे बिघडलेले आरोग्य सुधारण्यासाठी आंब्याचे सेवन केले जाते. यामध्ये आढळून येणारे जीवनसत्त्वे अ, क आणि ई केसांच्या आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरतात.
आंब्यामध्ये आढळून येणारे घटक शरीराचे हानिकारक पेशींमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी मदत करतात. आंब्यामध्ये एक विशेष प्रकारचे मॅंगिफेरिन आढळून येते.