जगभरात मधुमेहासारख्या गंभीर आजाराने अनेक लोक त्रस्त आहेत. मधुमेह झाल्यानंतर रक्तातील साखर वाढू लागते. योग्य वेळी लक्ष न दिल्यामुळे शरीराच्या इतर अवयवांना इजा पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे रक्तात वाढलेली साखर कायमच नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. मधुमेह झाल्यानंतर अनेक लोक नियमित कारल्याचा रस किंवा दुधी भोपळ्याच्या रसाचे सेवन करतात. पण या रसांचे सेवन करण्यासोबतच तुम्ही आहारात वेगवेगळ्या भाज्या सुद्धा खाऊ शकता. आज आम्ही तुम्हाला रोजच्या आहारात कोणत्या भाज्यांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)
दैनंदिन आहारात 'या' भाज्यांचे सेवन केल्यास कधीच होणार नाही मधुमेह, रक्तातील साखर राहील कायमच नियंत्रणात
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत अनेकांना तोंडलीची भाजी खायला अजिबात आवडत नाही. पण तोंडलीच्या भाजीमध्ये असलेले गुणकारी घटक रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतात. त्यामुळे तुम्ही कच्ची तोंडलीसुद्धा खाऊ शकता.
वारमध्ये सोल्युबल फायबर जास्त प्रमाणात आढळून येते. त्यामुळे आहारात गवारीच्या भाजीचे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा सेवन करावे. या भाजीच्या सेवनामुळे रक्तातील साखर वाढत नाही.
पडवळमध्ये फ्लावोनाईड्स मोठ्या प्रमाणावर आढळून येते. त्यामुळे खोबऱ्याचा वापर करून तुम्ही पडवळ भाजी बनवू शकता. रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी पडवळ भाजी बनवली जाते. याशिवाय गौरी गणपतीच्या नैवेद्यासाठी प्रामुख्याने पडवळ भाजी बनवली जाते.
आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा शेवग्याच्या भाजीचे सेवन करावे. महिलांच्या आरोग्यासाठी शेवग्याच्या शेंगा आणि भाजी वरदान ठरते. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
दोडक्याची साल काढून फेकून दिली जाते. पण साल फेकून न देता त्यापासून चटणी बनवावी. मधुमेह, वाढलेले वजन कमी करण्यासाठी दोडक्याच्या भाजीचे सेवन करावे.