हिंदू विवाह सोहळ्यात सप्तपदीच्या सात वचनांना विशेष महत्व आहे. सप्तपदी घेतल्यानंतर विवाह सोहळा पूर्ण होतो. लग्नात नवरा नवरी सप्तपदी घेऊन आयुष्यभराची विवाह गाठ बांधतात. लग्न म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर आणि आनंदाचा दिवस असतो. सप्तपदी घेताना नवरा आणि नवरी पवित्र अग्नीभोवती सात फेरे घेतात. या सात फेऱ्यांसोबतच, वर आणि वधू सात वचनं घेतात. या वचनांमध्ये वधू आणि वर एकमेकांना आपल्या नात्यांमधील जबाबदाऱ्या व्यक्त करतात. आज आम्ही तुम्हाला सप्तपदी विधीसाठी फुल आणि सुपाऱ्यांचे युनिक डेकोरेशन कसे करावे, याच्या काही सुंदर डिझाईन्स दाखवणार आहोत. (फोटो सौजन्य – pinterest)
लग्नात अशा प्रकारे करा सप्तपदींसाठी फुलांचे-सुपाऱ्यांचे अप्रतिम डेकोरेशन
लग्न म्हंटल की खूप जास्त घाईगडबड होते. अशावेळी कमीत कमी वेळेत तुम्ही या पद्धतीचे डेकोरेशन सप्तपदीसाठी करू शकता. फुलांची रांगोळी अतिशय उठावदार दिसेल.
तुम्हाला जर सप्तपदी घेताना सुपारीचा वापर करायचा नसेल तर तुम्ही वेगवेगळ्या रंगाची पायांची पाऊल किंवा ठशांचा वापर करू शकता.
विवाहात सोहळ्यात सप्तपदी घेताना तुम्ही वेगवेगळ्या डायमंड किंवा इतर मणी लावून डिझाईन केलेल्या सुपाऱ्यांचा वापर करू शकता. या सुपाऱ्या विड्याच्या पानांवर अतिशय सुंदर दिसतील.
पारंपरिक पद्धतीमध्ये सुपाऱ्यांचा वापर करून सुद्धा सुंदर डेकोरेशन करता येईल. सप्तपदीसाठी साध्या सुपाऱ्या घेऊन त्याभोवती तुम्ही पांढऱ्या फुलांचे डेकोरेशन करू शकता.
वेगवेगळ्या रंगीत फुलांचा वापर करून तुम्ही सप्तपदीसाठी सुंदर डिकोरेशन करू शकता. फुलांच्या रांगोळीमध्ये प्रत्येक वचनांचा अर्थ सुद्धा लिहिता येईल.