दाट, लांबसडक आणि घनदाट केस मिळविण्यासाठी, आजी अनेकदा केसांना तेल लावायला सांगते. अगदी आईदेखील आपल्या मागे लागते. तेल लावल्याने केसांना आवश्यक पोषण मिळते. केसांच्या वाढीसाठी बहुतेक घरांमध्ये नारळाचे तेल वापरले जाते. नारळाच्या तेलात अँटी-बॅक्टेरियल आणि लॉरिक अॅसिड आढळते, जे केस लांब करण्यास मदत करू शकते. तुम्हाला माहिती आहे का की हे हिरवे पान नारळाच्या तेलात घालून केसांना लावल्याने केसांच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो? ब्युटिशियन स्मिता कांबळे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे (फोटो सौजन्य - iStock)
केसांची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्हालाही घनदाट, काळे आणि लांबसडक केस हवे असतील तर हिरव्या पानांची तुम्ही मदत घेऊ शकते
केसांच्या वाढीसाठी कढीपत्तादेखील खूप चांगला मानला जातो. नारळाच्या तेलात कढीपत्ता घालून ते लावल्याने केस गळती नियंत्रित करता येते
नारळाच्या तेलात फॅटी अॅसिड, अँटीबॅक्टेरियल आणि लॉरिक अॅसिड असते जे केस गळतीची समस्या नियंत्रित करू शकते. खोबरेल तेल लावल्याने टाळूमध्ये बुरशीजन्य आणि बॅक्टेरियाच्या संसर्गाचा धोकादेखील कमी होतो
सर्वप्रथम नारळाचे तेल घ्या, ते गरम करा. आता या तेलात कढीपत्ता घाला. तेल थंड झाल्यावर हे तेल केसांना लावा. सौम्य शाम्पूने केस धुवा
तुम्ही आठवड्यातून दोनदा नारळ आणि कढीपत्त्याचे हे घरगुती तेल केसांना लावू शकता. केस धुण्याच्या १ तास आधी केसांना तेल लावा
कडिपत्त्याचे अनेक फायदे आहेत. केवळ आरोग्यासाठीच नाही तर केसांसाठीही कडिपत्त्याचा तुम्ही उपयोग करून घेऊ शकता. कोणतीही अलर्जी असल्यास डर्मेटॉलॉजिस्टचा सल्ला घ्यावा