‘डायरी ऑफ विनायक पंडित’चे गुपित काय असेल ? ट्रेलरमुळे वाढली उत्सुकता
काही गोष्टी आपली पाठ कधीच सोडत नाहीत. संपवण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही संपत नाहीत. अशाच काही गोष्टी सोबत घेऊन निघालेल्या कलाकाराचा जीवनप्रवास ‘डायरी ऑफ विनायक पंडित’(Diary Of Vinayak Pandit) मधून उलगडणार आहे. चित्रबोली क्रिएशन्स निर्मित, वन कॉम प्रॉडक्शन सहनिर्मिती आणि अक्षय विलास बर्दापूरकर सादर करत असलेल्या ‘डायरी ऑफ विनायक पंडित’ या वेबफिल्मचा ट्रेलर (Diary Of Vinayak Pandit Trailer) सोशल मीडियावर नुकताच प्रदर्शित झाला आहे.ट्रेलरमुळे डायरीचे गुुपित काय असेल? याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. मयूर शाम करंबळीकर दिग्दर्शित या वेबफिल्ममध्ये अविनाश खेडेकर, सुहास शिरसाट, पायल जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या 1 सप्टेंबरपासून ही वेबफिल्म प्रेक्षकांना प्लॅनेट मराठी ओटीटीवर (Planet Marathi OTT) पाहता येईल.