चेहऱ्यावर येणारे मुरूम आणि पिंपल्स कायमच सगळ्यांचं त्रासदायक वाटतात. कारण मुरूम आल्यानंतर चेहऱ्यावर काळे डाग तसेच राहतात, जे कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा चेहऱ्यावर दिसून येतात. चेहऱ्यावर आलेल्या मुरूम आणि पिंपल्समुळे वेदना सुद्धा होतात, यामुळे महिलांचा आत्मविश्वास कमी होऊन जातो. रोजच्या आहारात खाल्लेल्या पदार्थांचा थेट परिणाम त्वचेवर लगेच दिसून येतो. त्यामुळे आहारात कायमच सहज पचन होणाऱ्या आणि शरीरास आवश्यक असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला कोणते पदार्थ खाल्ल्यामुळे चेहऱ्यावर लगेच पिंपल्स येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. त्यामुळे हे पदार्थ आहारात अजिबात खाऊ नये. (फोटो सौजन्य – istock)
रोजच्या आहारात चुकूनही सेवन करू नका 'हे' पदार्थ, पिंपल्समुळे काही होईल चेहऱ्यावरील चमकदार ग्लो

मिठाई, सॉफ्ट ड्रिंक्स, पॅकेज्ड ज्यूस किंवा जास्त साखर असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे रक्तात साखरेची पातळी वाढण्यासोबतच चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स आणि मुरूम येतात.

दूध, चीज, दही आणि आईस्क्रीम यांसारखे दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्यास पिंपल्स आणि मुरूम येतात. कारण या पदार्थांमध्ये असलेल्या घटकांमुळे हार्मोन्सचे असंतुलन होते.

अनेकांना सकाळच्या नाश्त्यात किंवा संध्याकाळच्या वेळी समोसे, कचोरी, फ्रेंच फ्राईज, बर्गर आणि पिझ्झा यांसारखे तळलेले पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. पण या पदार्थांच्या सतत सेवनामुळे त्वचेवर हानिकारक परिणाम दिसू लागतात.

चिप्स, इन्स्टंट नूडल्स, केक, कुकीज आणि रेडी-टू-ईट स्नॅक्स यांसारख्या पदार्थांमध्ये मीठ, साखर, प्रिझर्व्हेटिव्ह्ज आणि अस्वास्थ्यकर चरबी असलेले घटक जास्त असतात. त्यामुळे मुरूम आणि पिंपल्स येण्याचा धोका वाढतो.

पांढरा ब्रेड किंवा पाव सकाळच्या नाश्त्यात सतत खाऊ नये. सतत यीस्ट असलेले पदार्थ खाल्ल्यामुळे पचनक्रिया बिघडण्यासोबतच चेहऱ्यावर पिंपल्स आणि फोड येऊ लागतात.






