जगभरात सगळीकडे २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो.सकाळी उठल्यानंतर नियमित योगासने किंवा प्राणायाम केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. शरीरात निर्माण झालेल्या समस्या दूर करण्यासाठी आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी योगासने करावीत. थंडीच्या दिवसांमध्ये अनेकांना संधिवाताची समस्या जाणवू लागते. संधिवात झाल्यानंतर हातापायांची बोटे वाकडी होऊन जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला संधिवातापासून आराम मिळवून देण्यासाठी नियमित कोणती योगासने करावीत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. योगासने केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतील. (फोटो सौजन्य – istock)
संधिवाताच्या समस्येपासून कायमचा आराम मिळवण्यासाठी नियमित करा 'ही' योगासने
सकाळी उठल्यानंतर नियमित योगासने केल्यामुळे सांध्याची लवचिकता वाढते, रक्ताभिसरण सुधारते, स्नायू मजबूत होतात आणि वेदनांपासून आराम मिळतो. संधिवातापासून आराम मिळवण्यासाठी नियमित सकाळी उठल्यानंतर ताडासन करावे. यामुळे शरीराचे संतुलन सुधारते.
वृक्षासन केल्यामुळे शरीराचे संतुलन आणि लक्ष केंद्रित करण्यास मदत होते. हे आसन नियमित केल्यामुळे पाय आणि कंबरेचे सांधे मजबूत होतात आणि संधिवाताच्या समस्येपासून आराम मिळतो.
भुजंगासन हे कंबर आणि मणक्यासाठी खूप फायदेशीर आहे. या आसनाचा नियमित सर्व केल्यास सांध्यांमधील वेदनांपासून आराम मिळेल आणि शरीर सुधारण्यास मदत होईल.
सेतुबंधासनामुळे कंबर आणि पाठीचा कणा मजबूत होतो. हे आसन केवळ पाठीचा कणाच नाहीतर संपूर्ण शरीरासाठी प्रभावी आहे. सेतुबंधासना नियमित केल्यास पाठ आणि पोटाचे स्नायू मजबूत होतात.
सुखासन केल्यामुळे शरीरावरील तणाव कमी होतो आणि मानसिक आरोग्य सुधारते. सुखासन आणि प्राणायाम केल्यास संधिवाताची समस्या नाहीशी होईल आणि आराम मिळेल.