शरीरात सर्वच विटामिनची पातळी कायमच संतुलित असणे आवश्यक आहे. कारण विटामिन शरीराला पोषण देतात. पण बऱ्याचदा शरीरात पोषक घटकांची कमतरता निर्माण झाल्यानंतर संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. विटामिन बी १२ ची कमतरता निर्माण झाल्यानंतर थकवा, अशक्तपणा, जिभेवर सतत होणाऱ्या जखमा, हाडांमध्ये वाढलेल्या वेदना इत्यादी अनेक गंभीर लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला शरीरात निर्माण झालेली विटामिन बी १२ ची कमतरता भरून काढण्यासाठी कोणत्या फळांचे सेवन करावे, याबद्दल जाणून घ्या सविस्तर माहिती. (फोटो सौजन्य – istock)
वारंवार जिभेवर जखमा होतात? विटामिन बी १२ ची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात करा 'या' फळांचा समावेश

सफरचंद खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. यामध्ये फायबर, विटामिन बी १२ आणि इतर घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. सफरचंद खाल्ल्यामुळे शरीरात ऊर्जा कायमच टिकून राहते.

शरीरासाठी डाळिंब सुपरफूड मानले जाते. डाळिंबाच्या दाण्यांमध्ये शरीरास आवश्यक असलेले अनेक घटक आढळून येतात. यामध्ये असलेले भरपूर फायबर, विटामिन आणि अँटिऑक्सिडंट्स शरीराला आजारांपासून दूर ठेवतात.

सकाळच्या नाश्त्यात नियमित दोन किंवा तीन केळी खावी. यामुळे शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते आणि तुम्ही कायमच निरोगी राहता. केळी खाल्ल्यामुळे विटामिन बी १२ ची पातळी सुधारते.

थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात पेरू मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. नियमित एक पेरू खाल्ल्यास विटामिन A, विटामिन के, फोलिक ऍसिड आणि पोटॅशियम असते.

संत्रींमध्ये भरपूर प्रमाणात विटामिन बी १२ आणि विटामिन सी असते. त्यामुळे आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा नियमित संत्री किंवा संत्र्याचा रस प्यावा.






