दिवाळी सणाच्या आठवडाभरानंतर तुळशी विवाह केला जातो. यंदाच्या वर्षी 13 नोव्हेंबर ला तुळशी विवाह साजरा केला जाणार आहे. तुळशी विवाहाच्या दिवशी मोठ्या आनंद असतो. तुळशी विवाहाला देवउठणी एकादशी असे देखील म्हणतात. त्यामुळे घरी कोणतेही शुभ कार्य असल्यानंतर अंगणात रांगोळी काढली जाते. रांगोळी काढल्यामुळे अंगणाची आणि दाराची शोभा वाढते. त्यामुळे यंदाच्या तुळशी विवाहाच्या दिवशी अंगणात या सुंदर डिझाइन्सची रांगोळी नक्की काढा.(फोटो सौजन्य-pinterest)
तुळशी विवाहासाठी अंगणात काढा 'या' डिझाइन्सची सुंदर रांगोळी
संस्कार भारती रांगोळी काढून तुम्ही त्यात तुलसी विवाहाच्या शुभेच्छा देऊ शकता. या पद्धतीची रांगोळी काढण्यासाठी वेगवेगळ्या उठावदार रंगांचा वापर केला जातो.
ठिपक्यांची रांगोळी काढण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे तुमच्या अंगणात जास्त मोठी जागा असेल तर तुम्ही या पद्धतीची सुंदर रांगोळी काढू शकता.
तुळशी विवाहाच्या दिवशी सर्वच अंगणात रांगोळी काढतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या अंगणात तुळस काढू शकता. तुळस दारात असली की अंगणाची शोभा वाढते.
दारासमोर रांगोळी काढताना खडूच्या साह्याने तुळस काढून घ्या. त्यानंतर त्यात वेगवेगळे रंग भरून सुरेख रांगोळी काढा. तसेच तुम्ही ही रांगोळी काढताना त्यात फुलांचा सुद्धा वापर करू शकता.
सण उत्सवाच्या दिवसांमध्ये घरात पूजेसाठी फुले आणली जातात. याचं फुलांचा वापर करून सुंदर रांगोळी तयार करता येईल. फुलांची रांगोळी तुमच्या अंगणाची शोभा वाढवण्यास मदत करेल.