जेवण बनवताना विविध गरम मसाल्यांचा आवर्जून वापर केला जातो. त्यातील सगळ्यांच्या आवडीच्या पदार्थ म्हणजे बडीशेप. जेवणानंतर सगळ्यांचं बडीशेप खायला खूप जास्त आवडते. बडीशेप खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होण्यास मदत होते. गॅस , ॲसिडिटी आणि पोट फुगणे इत्यादी बऱ्याच समस्यांपासून सुटका मिळते.याशिवाय यामध्ये असलेले गुणकारी घटक आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर काढून टाकण्यास मदत करतात. त्यामुळे महिनाभर नियमित बडीशेपचे पाणी प्यायल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील. (फोटो सौजन्य – istock)
महिनाभर उपाशी पोटी नियमित प्या बडीशेपचे पाणी! पचनाच्या त्रासापासून मिळेल कायमची सुटका, पोट राहील स्वच्छ

रात्री झोपण्याआधी एक ग्लास पाण्यात १ चमचा बडीशेप भिजत ठेवावी. रात्रभर भिजल्यानंतर सकाळी उठल्यानंतर बडीशेपचे पाणी गरम करून उपाशी पोटी प्यावे. यामुळे सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होते.

वाढलेले वजन कमी करण्यासाठी महिलांसह पुरुष सुद्धा वेगवेगळे सप्लिमेंट्स पितात. पण त्याऐवजी उपाशी पोटी बडीशेपचे पाणी प्यायल्या पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होईल.

बडीशेपमध्ये औषधी गुणधर्म केवळ पचनक्रिया सुधारण्यासाठीच नाहीतर खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होण्यासाठी सुद्धा मदत करतात. पोटात वाढलेला जडपणा कमी करण्यासाठी बडीशेप खावी.

नियमित बडीशेप खाल्ल्यास तोंडाच्या दुर्गंधीपासून कायमची सुटका मिळेल आणि दात स्वच्छ राहण्यास मदत होईल. तोंडातील जंतूंना कमी होऊन हिरड्यांचे आरोग्य चांगले राहील.

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी बडीशेपचे पाणी प्यावे. यामुळे शरीरातील हार्मोन्सचे संतुलन राखण्यास मदत होते.






