उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये त्वचेची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हाळ्यामुळे टॅन किंवा काळवंडलेला चेहरा सुधारण्यासाठी महिला सतत काहींना काही केमिकल युक्त प्रॉडक्टचा वापर करतात. मात्र केमिकलयुक्त प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे त्वचेची गुणवत्ता खराब होऊन जाते. त्यामुळे त्वचेला वरून पोषण देण्याऐवजी आतून पोषण देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला उन्हामुळे काळवंडलेली त्वचा उजळ्वण्यासाठी नियमित कोणत्या रसाचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
उन्हाळ्यामध्ये चमकदार त्वचेसाठी नियमित प्या 'या' पदार्थांचे ज्यूस
डाळिंब त्वचेसाठी अतिशय गुणकारी मानले जाते. डाळिंबाचा रस किंवा दाणे खाल्यामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढून हिमोग्लोबिनची कमतरता दूर होते.
टोमॅटोमध्ये असलेले लायकोपीन नावाचे अॅंटीऑक्सिडेंट काळवंडलेली त्वचा सुधारण्यासाठी मदत करतात. त्यामुळे टोमॅटोचा रस नियमित प्यायल्यामुळे त्वचेचा टॅनिंगपासून बचाव होतो.
त्वचेसाठी मागील अनेक वर्षांपासून कोरफडचा वापर केला जात आहे. कोरफडीच्या रसाचे सेवन केल्यामुळे शरीरातील हानिकारक घटक बाहेर पडून जातात. याशिवाय त्वचा अतिशय उजळदार आणि चमकदार दिसू लागते.
नियमित बीटरूट आणि गाजरच्या रसाचे एकत्र सेवन केल्यामुळे त्वचा हायड्रेट राहते. यामध्ये असलेले अॅंटी-ऑक्सिडेंटन त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत करतात. याशिवाय बीट गाजरच्या रसाच्या सेवन केल्यामुळे शरीरातील हानिकारक घटक बाहेर पडून जातात.
उन्हाळ्यात दैनंदिन आहारात नियमित काकडीचे सेवन करावे. काकडीमध्ये असलेले पाणी त्वचेसाठी अतिशय फायदेशीर ठरते. यामध्ये असलेल्या पाण्यामुळे त्वचा हायड्रेट आणि चमकदार राहते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नियमित काकडीचे सेवन करावे.