कॅल्शियम युक्त दुधाचे सेवन कायमच केले जाते. चहा, कॉफी किंवा इतर गोड पदार्थ बनवण्यासाठी दुधाचा वापर केला जातो. तसेच बाजारात अनेक वेगवेगळ्या ब्रँडचे दूध उपलब्ध असते. अनेक लोक पॅक बंद दूध वापरण्याऐवजी डेअरीमधील दूध विकत आणतात. दूध शरीरासाठी अतिशय महत्वाचे आणि पौष्टिक मानले जाते. पण भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने केलेल्या एका सर्वेक्षणामुळे दुधाच्या गुणवत्तेबद्दल चिंता आणि असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत. दुधात केली जाणारी भेसळ नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करू शकते. पाणी, स्टार्च, डिटर्जंट, युरिया आणि कृत्रिम घटकांसारखे भेसळयुक्त पदार्थ दुधात आढळून आल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे भेसळयुक्त दूध ओळखण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स.(फोटो सौजन्य – istock)
दूध शुद्ध आहे की भेसळयुक्त? 'या' टिप्स फॉलो करून ओळखा दुधाची गुणवत्ता, अन्यथा आरोग्याचे होईल नुकसान

भेसळ युक्त दुधात पाणी, स्टार्च, डिटर्जंट, युरिया आणि कृत्रिम घटकांचा वापर केला जातो. यामुळे दुधाची गुणवत्ता पूर्णपणे बिघडून जाते आणि अशा दुधाचे सेवन केल्यास शरीराला धोका निर्माण होण्याची शक्यता असते.

भेसळयुक्त दुधाचे सेवन केल्यास पचनाच्या समस्या, यकृत आणि मूत्रपिंडांवर परिणाम होऊन किडनी निकामी होऊ शकते. याशिवाय रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढू लागते.

काच किंवा फरशीसारख्या गुळगुळीत पृष्ठभागावर दुधाचा एक थेंब टाका. त्यानंतर फारशी किंवा काच हलवून पाहिल्यास थेंब फारसा न हलता एकाच जागी राहिल्यास त्यात पाणी मिक्स आहे.

दुधाचा घट्टपणा वाढवण्यासाठी त्यात स्टार्च मिक्स केले जातात. यासाठी एक ग्लासात दूध घेऊन त्यात आयोडीनच्या द्रावणाचे काही थेंब टाका. दुधाचा रंग निळा झाल्यास त्यात स्टार्च मिक्स केलेले आहेत.

दूध घट्ट दिसावे म्हणून त्यात डिटर्जंट किंवा वॉशिंग पावडर मिक्स केले जाते. हे घटक शरीरासाठी अतिशय हानिकारक आहेत. यामुळे किडनी आणि शरीरातील इतर नाजूक अवयवांवर परिणाम होऊ शकतो.






