महाभारत एक अशी कथा आहे, जी समजण्यासाठी फार मोठे काळजीपूर्वक वाचन असणे आवश्यक आहे. यात जगातील महान योद्धांचा उल्लेख आहे. यात अर्जुन, कर्ण, भीष्मसारख्या महान योध्दांच्या कथा आहेत. त्यातील एक पात्र म्हणजे द्रोण! द्रोणाचार्य हे महाभारतातील एक गुरु होते, ज्यांच्या गुरुकुलात पांडवांनी तसेच कौरवांनी शिक्षण घेत मोठे झाले.
अशा प्रकारे गुरु द्रोणाचार्यांचा वध करण्यात आला. (फोटो सौजन्य - Social Media)
द्रोणाचार्यांना एक मुलगा होता, ज्याला अश्वत्त्थामा नावाने ओळखले जाते. असे म्हणतात की अश्वत्थामा चिरंजीवी आहे आणि अजून पृथ्वीतलावर हयात आहे.
भीष्मांच्या मृत्यूनंतर कुरुक्षेत्रावर कौरवांची धुरा द्रोणांनी सांभाळली. त्यांना मारणे पांडवसेनेला अशक्यच झाले होते. तेव्हा श्री कृष्णांनी पांडवांना महत्वाचा उपदेश दिला.
कधीही खोटं न बोलणाऱ्या धर्मराज युद्धिष्ठिराला अर्धसत्य बोलावं लागलं कारण त्या शिवाय द्रोणांना मारणे कठीण होते.
भीम याने कुरुक्षेत्रावरील एका अश्वत्थामा नावाच्या हत्तीला ठार केले आणि युद्धिष्ठिराने द्रोणांना जाऊन सांगितले की अश्वत्थामा मेला!
द्रोणांना वाटले की त्यांचा पुत्र अश्वत्थामा मेला, त्यांनी जागीच हत्यार सोडले आणि मौन अवस्थेत गेले, याचा फायदा घेत धृष्टद्युम्नाने त्यांच्यावर हल्ला करत त्यांना ठार केले.