वाळलेल्या आल्याला कोरडे आले म्हणून ओळखले जाते किंवा याचा प्रचारातील शब्द आहे तो म्हणजे सुंठ. सुंठाची पावडर अनेक फायदे मिळवून देते हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. शेकडो वर्षांपासून आयुर्वेदात सुंठाचा वापर केला जात आहे. खोकला, सर्दी, ताप यापैकी कोणताही आजार असला तरी आजीच्या बटव्यातून सुंठ हमखास निघते आणि सुंठ खाण्याचे तर अनेक फायदे होतात. आयुर्वेदिक डॉक्टर माधव भागवत यांनी सुंठ खाण्याचे फायदे आणि त्याचा कसा उपयोग शरीरासाठी होऊ शकतो हे सांगितले आहे, तुम्हीही नक्की वाचा आणि उपयोग करून घ्या (फोटो सौजन्य - iStock)
सुंठ ही प्रत्येकाच्या घरात सापडणारी वस्तू आहे. सुंठीचा उपयोग अनेक खाण्याचा पदार्थांमध्ये आणि वेगवेगळ्या आजारांवर केला जातो, जाणून घ्या सुंठ खाण्याचे फायदे
सुंठ पाचन तंत्र सक्रिय करते. अशा स्थितीत अन्नाचे सेवन केल्याने अन्नाचे पचन चांगले होते. याशिवाय गॅस आणि ब्लोटिंगमध्येही सुंठ खूप फायदेशीर मानली जाते
सुंठामध्ये अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्म आढळतात. या गुणामुळे, सर्दी, खोकला आणि घसादुखीचा त्रास होत असतानाही सुंठ ही आपल्यासाठी फायदेशीर आहे
जर एखाद्या व्यक्तीला सांधेदुखीचा त्रास होत असेल तर सुंठ त्याच्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. हे खाल्ल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो
सुंठ खाल्ल्याने मेटाबॉलिज्म वाढते. जे वजन कमी करण्यात खूप मदत करते. त्यामुळे जर एखादी व्यक्ती वजन कमी करण्याच्या प्रवासात असेल तर तो त्याचे सेवन करू शकतो
सुंठ महिलांसाठीही खूप फायदेशीर आहे. मासिक पाळीच्या दरम्यान वेदना आणि पेटके कमी करण्यासाठी सुंठ खूप प्रभावी आहे
सुंठीमध्ये असलेले रोग-विरोधी तत्व शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवतात. त्यामुळे आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि शरीराला रोगांशी लढण्याची ताकद मिळते