नैसर्गिक गोडवा असलेले गूळ आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. गुळाचे सेवन केल्यामुळे शरीरात उष्णतेचे प्रमाण वाढू लागते. थंडीच्या दिवसांमध्ये शरीरातील कमी झालेली उष्णता वाढवण्यासाठी अनेकदा गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र उन्हाळ्यात गूळ खाऊ नये. कारण यामध्ये असलेली उष्णता आरोग्यासाठी अतिशय घातक ठरते. गुळाचे सेवन केल्यामुळे शरीराची कमी झालेली ऊर्जा वाढते, रोगप्रतिकारशक्ती सुधारते इत्यादी अनेक फायदे होतात. मात्र उन्हाळ्यात गुळाचे सेवन करू नये. आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये गूळ खाल्यामुळे आरोग्यासंबंधित कोणत्या गंभीर समस्या दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – iStock)
कडक उन्हाळ्यात गूळ खाणे आरोग्यासाठी ठरेल अतिशय घातक!
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जास्त प्रमाणात गुळाचे सेवन केल्यास शरीरात उष्णता निर्माण होऊन जळजळ किंवा पिंपल्स वाढू शकता. त्यामुळे उन्हाळ्यात जास्त गूळ खाऊ नये.
मधुमेह असलेल्या रुग्णांनी उन्हाळ्यात गुळापासून बनवलेले पदार्थ आणि नुसत्याच गुळाचे सेवन करू नये. यामुळे आरोग्याला हानी पोहचते. रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढू लागते.
गूळ खाल्यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर पिंपल्स किंवा मुरूम येऊ शकतात. त्वचेवर आलेले मुरूम आणि पिंपल्स लवकर निघून जात नाहीत. याशिवाय त्वचा देखील खराब होऊन जाते.
गुळाचे सेवन केल्यामुळे शरीरात उष्णता वाढते, ज्यामुळे डिहायड्रेशन किंवा थकवा अशक्तपणा जाणवू शकतो. त्यामुळे उन्हाळ्यात गूळ खाऊ नये.
शरीरात निर्माण झालेली उष्णता कमी करण्यासाठी लिंबाच्या पाण्यात गूळ टाकून प्यावे, यामुळे उष्णता कमी होऊन शरीरात थंडावा राहील.