हिवाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणातील बदलांमुळे शरीराची ऊर्जा कमी होऊ लागते. शरीरात ऊर्जाचे प्रमाण कमी झाल्यानंतर साथीचे आजार होण्याची शक्यता असते. साथीच्या आणि इतर आजारांपासून शरीराचे नुकसान होऊ नये, म्हणून आहारात पौष्टिक आणि हेल्दी पदार्थांचे सेवन करावे, हवामानात सतत बदल होत असतात. हे बदल झाल्यानंतर आरोग्य बिघडते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला रोगप्रतिकारशक्ती मजबूत कारण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत.(फोटो सौजन्य-istock)
रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी गुणकारी पदार्थ
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात अनेक हंगामी फळे उपलब्ध असतात. त्यामध्ये तुम्ही सफरचंद, पेरू, चिकू, सीताफळ, डाळिंब इत्यादी फळांचे सेवन करू शकता. या फळांच्या सेवनामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड आढळून येते ज्यामुळे शरीरात होणारी जळजळ कमी होते आणि फुफ्फुसांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते.
ब्रोकोलीमध्ये सल्फोराफेन असते जे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आहे. तसेच प्रदूषणामुळे फुफ्फुसांचे होणारे नुकसान टाळता येते.
अँटीऍक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध असलेली लसूण जेवणातील सर्वच पदार्थांमध्ये वापरली जाते. लसूण खाल्यामुळे संसर्गासोबत लढण्यासाठी मदत होते.
जेवणातील पदार्थांमध्ये वापरली जाणारी हळद आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. हळदीमध्ये कर्क्यूमिन नावाचा घटक आढळून येतो, ज्यामुळे शरीरात होणारी जळजळ कमी होण्यास मदत होते.