भारतीय संस्कृतीमध्ये दागिन्यांना विशेष महत्व आहे. सणावाराच्या दिवसांमध्ये किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमात महिला सुंदर सुंदर दागिने घालून तयार होतात. लग्न झाल्यानंतर नव्या नवरी गळ्यात जसे मंगळसूत्र घालतात तसेच पायात चांदीच्या जोडव्या सुद्धा घातल्या जातात. चांदीच्या जोडव्या पायांची शोभा वाढवतात. बाजारात अनेक वेगवेगळ्या डिझाईनच्या जोडव्या उपलब्ध आहेत. मोर, कमळ, किंवा साधे गोल नक्षीकाम केलेले डिझाईन्स अतिशय लोकप्रिय आहेत. (फोटो सौजन्य – pinterest)
नव्या नवरीच्या पायांमध्ये शोभून दिसतील 'या' युनिक ट्रेडिंग डिझाईन्स जोडव्या

आधुनिक आणि पारंपरिक डिझाईनची जोडवी पायांमध्ये अतिशय सुंदर दिसते. नाजूक साजूक फुलांच्या आकारातील जोडवी पायांमध्ये उठावदार दिसते.

लहान रंगीत किंवा पांढऱ्या स्टोन्सचा वापर करून तयार केलेली जोडवी कोणत्याही साडीवर किंवा ड्रेसवर अतिशय सुंदर दिसते. यामुळे तुम्हाला ग्लॅमरस लुक मिळेल.

पूर्वीच्या काळी सर्वच महिला पायाच्या बोटांमध्ये चांदीच्या मासोळ्या परिधान करत असे. आकाराने मोठ्या असलेल्या मासोळ्या पायांमध्ये अतिशय सुंदर दिसतात.

पायांमधील जोडव्या आणि पैंजण एकमेकांशी जोडलेल्या असतात. त्यामुळे नाजूक साजूक डिझाईनच्या जोडव्या नेहमीच्या वापरासाठी घालू शकता.

नवरीच्या पायात प्रामुख्याने या डिझाईनच्या जोडव्या असतात. यामुळे पाय भरगच्च दिसतात आणि पायांची शोभा वाढते.






