सर्वच महिला आणि मुलींना साडी नेसायला खूप आवडते. साडी नेसल्यानंतर महिलांच्या सौदंर्यत आणखीन वाढ होते. साडी नेसल्यानंतर त्यावर मॅच होतील असे सुंदर दागिने, मेकअप करून छान लुक केला जातो. मात्र अनेकदा साडी नेसताना साडीच्या निऱ्या व्यवस्थित येत नाहीत तर कधी साडीचा पदर काढताना चुका होतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला तुमची साडी आणखीन आकर्षक आणि सुंदर दिसण्यासाठी आलीय भट, कियारा अडवाणीसह इतर प्रसिद्ध अभिनेत्रींना साडी नेसवणाऱ्या डोली जैन यांनी सांगितलेल्या काही खास टिप्स सांगणार आहोत. या टिप्स फॉलो करून साडी नेसल्यास तुम्ही अतिशय उठावदार आणि सुंदर दिसाल.(फोटो सौजन्य – pinterest)
साडी नेसताना फॉलो करा डॉली जैन यांनी सांगितलेल्या काही सोप्या टिप्स

कोणत्याही प्रकारातील साडी नेसण्याआधी तिला कडक इस्त्री करून घ्यावी. साडीला इस्त्री केल्यामुळे साडीच्या निऱ्या,पदर चापून चोपून बसतो. साडीला इस्त्री न केल्यामुळे तुमचा पूर्ण लुक खराब होऊ शकतो.

साडीच्या निऱ्या काढताना खालच्या भागात आणखीन एक कापड जोडून घ्यावे, ज्यामुळे साडीच्या निऱ्या व्यवस्थित येतील. सहा पद्धतीने निऱ्या काढल्यास लवकर सुटणार नाहीत.

साडीला इस्त्री करताना साधी इस्त्री करण्याऐवजी स्टीम इस्त्रीचा वापर करावा. ज्यामुळे साडीचा सुळसुळीतपणा कमी होतो आणि साडी व्यवस्थित अंगाला बसते.

साडी नेसल्यानंतर साडीला ३ ते ४ ठिकाणी व्यवस्थित पिनअप करून घ्यावे. ज्यामुळे साडी बराच वेळ व्यवस्थित राहील, साडीच्या निऱ्या किंवा पदर खाली येणार नाही.

काखेत आलेल्या घामामुळे ब्लाऊज खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे ब्लाऊज घालण्याआधी अंडरआर्म पॅडचा वापर करावा. यामुळे तुमचा ब्लॉउज खराब होणार नाही. ब्लॉउजची इस्त्री कायम टिकून राहील.






