भारतासह जगभरात सगळीकडे असंख्य दारूप्रेमी आहेत. पार्टी किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमात अल्कोहोलिक ड्रिंकचे सेवन केले जाते. बाजारात दारूचे अनेक वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत. त्यातील तरुणाईला वेड लावणारे पेय म्हणजे वाईन. वेगवेगळ्या फळांचा आणि पदार्थांचा वापर करून वाईन बनवली जाते. वाइन तज्ज्ञ सोनल हॉलंड यांनी सांगितल्यानुसार, बऱ्याचदा खराब वाईन सुद्धा सर्व्ह केली जाते. त्यामुळे वाईन पिण्याआधी ती चांगली आहे की नाही, हे तपासणे महत्वाचे ठरते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला खराब झालेली वाईन कशी ओळखावी? याबद्दल महत्वपूर्ण टिप्स सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – istock)
खराब झालेली वाईन ओळखण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, जाणून घ्या सविस्तर

सूर्याच्या किरणांमध्ये वाईन पोहोचल्यास ती खराब होण्याची शक्यता असते. यामुळे वाईनमध्ये रासायनिक प्रक्रिया होते आणि चव पूर्णपणे बिघडून जाते. वाईनमध्ये हवा शिरल्यानंतर चवीत बदल होतात.

वाईन खराब होणे हे तिच्या रंगावर अवलंबून असते. रेड वाईनचा रंग हळूहळू तपकिरी दिसू लागल्यास समजवून जावे वाईन खराब आहे. याशिवाय व्हाइट ट्रान्सपेरंट रंगाची वाईन पिवळी होण्यास सुरुवात होते.

वाईनचा वास बदलल्यानंतर ती पूर्णपणे खराब होऊन जाते. ताज्या वाईनमधून फ्रुटीसारखा वास येतो आणि वाईनची चव सुद्धा चांगली लागते.

वाइनमधून व्हिनेगर किंवा नेल पॉलिश रिमूव्हरचा वास येऊ लागल्यास वाईन खराब झाल्याचे संकेत आहेत. यामध्ये असलेल्या बॅक्टरीया संपूर्ण वाईन खराब करून टाकते.

वाईनचा फ्रेश रंग आणि वासावरून वाईन फ्रेश आहे की नाही हे लगेच समजून येते. त्यामुळे वाईन पिण्याआधी या गोष्टी व्यवस्थित तपासून पाहाव्यात.






