केरळमध्ये मोठ्या आनंद आणि उत्साहात दरवर्षी ओणम साजरा केला जातो. दक्षिण भारतात ओणमला विशेष महत्व आहे. यादिवशी घरासमोरील अंगणात सुंदर फुलांची रांगोळी काढली जाते. याशिवाय घरात केरळी पारंपरिक पदार्थ बनवले जातात. पुराणात सांगितल्यानुसार, राजा महाबलीला विष्णूने वरदान दिले होते की तो वर्षातून एकदा आपल्या प्रजेला भेटायला पृथ्वीवर येऊ शकतो. हा परत येण्याचा दिवस म्हणजे ओणम. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पांढऱ्या साडीवर कोणत्या रंगाचे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज परिधान करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या रंगाचे ब्लाऊज तुमच्या सौंदर्यात भर पाडतील. (फोटो सौजन्य: Pinterest)
ओणमनिमित्त पांढऱ्या रंगाच्या साडीवर घाला 'या' रंगाचे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज
पांढऱ्या रंगाच्या साडीवर तुम्ही डार्क हिरव्या रंगाचा ब्लाऊज परिधान करू शकता. हिरव्या रंगाचे आरी वर्क किंवा हॅण्ड पेंटिंग केलेले ब्लाऊज पांढऱ्या रंगाच्या साडीवर उठावदार दिसेल.
सर्वच महिलांकडे लाल रंगाचे अनेक वेगवेगळ्या शेड्सचे ब्लाऊज असतात. त्यामुळे साऊथ इंडियन पार्टनमधील साडीवर तुम्ही हिरव्या रंगाचा ब्लाऊज परिधान करू शकता.
गुलाबी आणि सोनेरी रंगाचे सुंदर नक्षीकाम करून शिवलेला ब्लाऊज पांढऱ्या साडीला मनमोहक लुक देतो. लुक आणखीनच सुंदर आणि उठावदार दिसण्यासाठी बारीक मोत्याचे सुंदर दागिने परिधान करू शकता.
कोणत्याही रंगाची किंवा फॅब्रिकची साडी खरेदी केल्यानंतर त्यात ब्लाऊज पीस असतो. त्यामुळे तुम्ही साडीच्या रंगाचा सेम ब्लाऊज शिवून घेऊ शकता.
साडीवर कॉन्ट्रास्ट ब्लाऊजची निवड करताना साडीवरील नक्षीकाम किंवा साडीची वैशिष्ट्य पाहून ब्लाऊजची निवड करावी. साडीवर तुम्ही निळ्या किंवा जांभळ्या रंगाचा ब्लाऊज परिधान करू शकता.