हिवाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात गाजर उपलब्ध होतात. गाजर खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात, असे कायमच मानले जाते. डोळ्यांची गेलेली दृष्टी पुन्हा परत मिळवण्यासाठी गाजर खाण्याचा सल्ला दिला जातो. गाजरमध्ये लोह, बीटा कॅरोटीन, अँटीऑक्सिडंट्स आणि दाहक-विरोधी गुणधर्म मुबलक प्रमाणात असतात.पण गोड चवीचे गाजर आरोग्यासाठी जितके चांगले असतात, तेवढेच वाईट सुद्धा असतात. त्यामुळे या समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात अजिबात गाजर खाऊ नये. (फोटो सौजन्य – istock)
'या' लोकांच्या आरोग्यासाठी गाजर ठरेल विषासमान

मधुमेह असलेल्या रुग्णांनी गाजर खाणे टाळावे. कारण गाजरांमध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे शरीरात साखरेची पातळी वाढण्याची शक्यता असते.

अतिप्रमाणात गाजर खाल्ल्यास त्वचेवर पिवळेपणा वाढू लागतो. गाजरांमध्ये बीटा-कॅरोटीन आढळून येते, ज्याचे शरीरात गेल्यानंतर रूपांतर होऊन विटामिन ए तयार होते. रक्तातील कॅरोटीनची पातळी वाढल्यानंतर त्वचा पिवळी होते.

किडनी स्टोन असलेल्या रुग्णांनी गाजर खाऊ नये.गाजरातील ऑक्सलेट घटकामुळे किडनीमधील स्टोन आणखीनच वाढू लागतो, जे आरोग्यासाठी अतिशय हानिकारक मानले जाते.

गाजरांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे जास्त गाजर खाल्ल्यास गॅस, जडपणा आणि अपचन वाढून डोकेदुखी, उलट्या, मळमळ इत्यादी समस्या वाढतात.

रात्रीच्या वेळी गाजर खाल्ल्यास गॅस आणि अपचनाच्या समस्या वाढून आरोग्य बिघडते. त्यामुळे रात्री गाजर खाऊ नये.






