पुण्यातील वैभवशाली गणेशोत्सवाचा उत्सव शिगेला पोचहला आहे. हा गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी पुणे पोलीस अहोरात्र कष्ट करत असतात. घरोघरी गणरायाचे आगमन झालेले आहे. दिवस-रात्र पुणेकरांची काळजी घेणारी आणि सेवा करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांची घरी देखील थाटात गणरायाचे आगमन झाले आहे. फुलांची आरास आणि मोठ्या उत्साहात अधिकाऱ्यांनी आपल्या घरी बाप्पाचे स्वागत केले आहे. पोलिस अधिकारी, महापालिकेचे प्रशासकीय अधिकारीही या आनंदात सहभागी झाले. एवढेच नव्हे तर त्यांनी घरातील बाप्पांची सजावट, आरती व पूजनही केले. (फोटो सौजन्य - टीम नवराष्ट्र)
Ganpati Bappa welcomed at Pune Police officer house
सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या घरी देखील मोठ्या उत्साहामध्ये गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. फुलांच्या सुंदर मखरामध्ये बाप्पा विराजमान करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख यांच्या घरी उत्साहाच्या वातावरणामध्ये गणपत्ती बाप्पाचे स्वागत करण्यात आले. पारंपारिक पद्धतीने घरी बाप्पा विराजमान झाले आहेत.
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी संपूर्ण परिवारासह गणेशाचे घरी स्वागत केले आहे. रांगोळी काढत आणि फुलांची सजावट करुन पिंगळे कुटुंबामध्ये बाप्पा वाजत गाजत आला आहे.
पुणे गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी अहोरात्र कष्ट घेणारे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या घरी देखील बाप्पाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. फुलांची आरास करत पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या घरी बाप्पा विराजमान झाला आहे.
पुणे महापालिकेचे सहायक आरोग्याधिकारी डॉ. संजीव वावरे यांच्या घरी देखील बाप्पाचे आगमन झाले आहे. त्यांनी सपत्नीक बाप्पाचे स्वागत केले.
सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा नाईक यांनी देखील मोठ्या उत्साहामध्ये गणपती बाप्पाचे घरी स्वागत केले आहे. फुलांच्या मखरामध्ये बाप्पा विराजमान झाला आहे.
विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी घरी बाप्पाचे वाजत गाजत स्वागत केले. परिवारासह त्यांनी गणेशोत्सवामध्ये सहभाग घेतला आहे.