फोटो सौजन्य: lanzantelimited/Instagram
सध्या सगळीकडे गणेशोत्सवामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गणपती हा चौसष्ट कलांचा अधिपती असण्यासोबत विद्येचा देवता आहे. तसेच कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करण्यापूर्वी गणरायाचा आशीर्वाद घेतला जातो. गणपती आद्यदैवत असल्याने अनेक जण त्याचे विविध नावं त्यांच्या व्यापाराला किंवा दुकानाला देत असतात. आता एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एका कारच्या लोगोवर चक्क गणपती बाप्पा दिसत आहे. आश्चर्य म्हणजे ही ऑटो कंपनी भारतीय नसून विदेशी आहे.
ब्रिटिश सुपरकार बनवणाऱ्या कंपनी Lanzante कंपनीची जोरदार चर्चा होत आहे. ही कंपनी सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. कंपनीच्या नवीन हायपरकारवर गणपती बाप्पाचा लोगो दिसत आहे. स्टीअरिंगवर आणि कंपनीच्या ब्रँड नाव लॅन्झांटेवर गणपती दिसत आहे. यामुळे भारतीय बाजारपेठेत या कंपनीला लवकरच एक वेगळी ओळख मिळेल अशी अपेक्षा आहे. याला ब्रँड व्हॅल्यूशी जोडले जात आहे. सोशल मीडियावर याबद्दल बरीच चर्चा आहे. तसेच कंपनीच्या लोगो आणि इमारतीमध्ये सुद्धा गणपती बाप्पा दिसत आहे.
भारतात TVS NTorq 150 लाँच होण्याच्या तयारीवर, दमदार इंजिनसह मिळणार अफलातून फीचर्स
Lanzante 95-59 नावाच्या या सुपरकारमध्ये गणपतीचे चित्र पाहायला मिळते. याची प्रेरणा द बीटल्स बँडचे जॉर्ज हॅरिसन यांनी घेतली होती. ते भारतीय अध्यात्माने खूप प्रभावित होते. हिंदू धर्मात गणपतीला सुखकर्ता आणि दुःखहर्ता मानले जाते. कंपनीचे म्हणणे आहे की गणपतीचे प्रतीक त्यांच्या विचारसरणीशी जुळते.
Lanzante कंपनी जुन्या रेसिंग कार सुधारित करण्यासाठी ओळखली जाते. आता त्यांनी त्यांची पहिली हायपरकार बनवली आहे. याला 95-59 असे म्हणतात. हे नाव 1995 मध्ये मॅकलरेन F1 GTR सह ले मॅन्स येथे झालेल्या विजयाची आठवण करून देते.
या हायपरकारमध्ये 850 एचपी ट्विन-टर्बो व्ही इंजिन आहे. त्याची बॉडी कार्बन-फायबरपासून बनलेली आहे. यामुळे ती हलकी होते. त्याचा मध्यवर्ती एक्झॉस्ट F-22 फायटर जेटपासून प्रेरित आहे. यामुळे कारची स्पीड आणखी जलद होतो.
भारतात Tata Winger Plus लाँच, या 9 सीटर कमर्शियल वाहनात मिळेल आरामच आराम
कंपनी फक्त 59 कार बनवेल. प्रत्येक कारवर गणपती बाप्पाचा लोगो असेल. याची किंमत सुमारे 13.8 लाख युरो (सुमारे 12.5 कोटी) पासून सुरू होते. म्हणूनच ही कार खूप खास आहे.
Lanzante 95-59 खूप महाग असू शकते. परंतु, त्याच्या लोगोने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावरून असे दिसून येते की कधीकधी डिझाइन पॉवरपेक्षा जास्त बोलते. इंटरनेटवर लोकांनी गणपतीच्या लोगोवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले की, ‘ही कार माझी आवडती कार आहे कारण तिच्या लोगोवर गणपती बाप्पा आहेत.