सेलिब्रिटी लवकर का जेवतात (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
आजच्या काळात लोक फिटनेस आणि निरोगी जीवनशैलीकडे अधिक लक्ष देऊ लागले आहेत. निरोगी राहण्यासाठी लोक वेगवेगळ्या गोष्टींचे पालन देखील करतात. यापैकी एक म्हणजे लवकर जेवणाची सवय. बॉलिवूड सेलिब्रिटींपासून ते आरोग्यतज्ज्ञांपर्यंत, सर्वजण लवकर जेवण करण्याच्या या सवयीवर भर देत आहेत म्हणजेच संध्याकाळी ५ ते ७ च्या दरम्यान.
खरं तर, रात्री उशिरा जेवल्याने तुमची पचनक्रिया बिघडतेच, पण झोप आणि वजनावरही परिणाम होतो. आयुर्वेदिक डॉक्टर माधव भागवत यांनी लवकर जेवणाचे अफलातून फायदे सांगितले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पचन चांगले होत असल्याने आरोग्याला अनेकही फायदे यामुळे मिळतात. हे नक्की फायदे कोणते आहेत, याबाबत लेखातून जाणून घेऊया (फोटो सौजन्य – iStock)
चांगले पचन
रात्री लवकर जेवण केल्याने शरीराला अन्न पचवण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. दुसरीकडे, जेव्हा तुम्ही रात्री उशिरा जेवता तेव्हा पचन प्रक्रिया मंदावते, ज्यामुळे गॅस, पोटफुगी आणि आम्लता यासारख्या समस्या वाढू लागतात. लवकर जेवण केल्याने तुमचे चयापचय जलद होण्यासोबतच अन्न चांगले पचण्यास मदत होते.
थोडे थोडे खावे की एकदमच पोटभर? जेवणाची ‘ही’ पद्धत आहे सगळ्यात बेस्ट
वजन कमी होणे
दुसरीकडे, जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रवासात असाल तर लवकर जेवण तुम्हाला मदत करू शकते. सेलिब्रिटींपासून ते फिटनेस तज्ञांपर्यंत, सर्वांचा असा विश्वास आहे की रात्री लवकर जेवण केल्याने कॅलरीज लवकर बर्न होतात आणि शरीरात चरबी जमा होत नाही. यामुळे वजन नियंत्रणात राहते आणि लठ्ठपणाची समस्या येत नाही. म्हणूनच अक्षय कुमार, मिलिंद सोमण, अनुष्का शर्मा, श्रद्धा कपूर यांसारखे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी लवकर जेवण हे त्यांच्या फिटनेसचे रहस्य मानतात.
चांगली झोप
लवकर जेवण शरीर आणि मन दोघांसाठीही फायदेशीर आहे. यासोबतच झोपही सुधारते. जेवल्यानंतर लगेच झोपल्याने पोट भरल्यासारखे वाटते आणि झोप येण्यास त्रास होतो. दुसरीकडे, रिकाम्या पोटी झोपणे हानिकारक असू शकते. अशा परिस्थितीत, लवकर जेवण करून जेवल्यानंतर २ ते ३ तासांनी झोपल्याने गाढ आणि चांगली झोप येते.
रात्री 9 नंतर जेवण जेवायला घ्याल तर पस्तवाल ! जाणून घ्या जेवणाची योग्य वेळ
हार्मोन्स बॅलन्स
आरोग्यतज्ज्ञांच्या मते, लवकर जेवण केल्याने इन्सुलिन आणि इतर हार्मोन्स संतुलित राहतात, यामुळे मधुमेह आणि हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका कमी होतो. याशिवाय, ते इंटरमिटंट फास्टिंगचे फायदे देखील देते, ज्यामुळे शरीराला दुरुस्तीसाठी पुरेसा वेळ मिळतो. याशिवाय तुम्हाला PCOD, मासिक पाळीच्या समस्या असतील तर त्या कमी व्हायलादेखील मदत मिळते. त्यामुळे रोज लवकर उठावे आणि दुपार असो वा रात्र लवकर जेवावे, ज्यामुळे तुमचे शरीर अधिक मजबूत आणि निरोगी राहण्यास मदत मिळते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.