घर सुंदर बनवायचं असेल किंवा आपल्या घराची शोभा वाढवायची असल्यास अनेकजण घरात किंव घराच्या गॅलरीत सुंदर आणि रंगीबेरंगी फुलांच्या कुंड्या बसवतात. कुंड्यामध्ये वाढवल्या जाणाऱ्या या फुलांची खूप काळजी घ्यावी लागते. त्यांना वेळेवर पाणी द्या, खत पुरवा, सूर्यप्रकाशाच्या जागी त्यांना हलवा अशा अनेक गोष्टी यात सामील आहेत पण तुम्हाला ठाऊक आहे का? हिवाळ्यात कोणतीही मेहनत न घेता तुम्ही काही सुंदर फुलांना कुंड्यांमध्ये उगवू शकता. चला ती कोणती फुले आहेत ते जाणून घेऊया.
डिसेंबर महिन्यात कुंड्यामध्ये उगवली जाणारी ही 7 फुले; घर सजवायचं असेल तर हीच आहे ती योग्य वेळ

झेंडू - नारंगी आणि पिवळ्या रंगाची झेंडूची फुले थंडीत सहज उगवली जातात. ती एकाच वेळी अनेक फुले देतात.

डायनथस - ही फुले, दुहेरी रंगात येतात, ती लहान वनस्पतींमध्ये देखील वाढतात. ही फुले दिसायला फार आकर्षक वाटतात.

पँसी - हे रागीट फुलांसारखे दिसू शकतात, पण ते वास्तविक फार सुंदर दिसतात.

पेटुनिया - पेटुनिया हे दक्षिण अमेरिकेतून आलेले एक लोकप्रिय, सुंदर फुलझाड आहे, जे विविध रंग आणि आकारांमध्ये उपलब्ध आहे.

गुलदाउदी - हे फुल फार सुंदर, रंगानी भरलेले आणि आकाराने मोठे असते. कोणाला गिफ्ट करण्यासाठीही हे एक सुंदर फुल आहे.

स्नॅपड्रॅगन - तुम्ही ही फुले बुकेमध्ये पाहिली असतील, पण ती कुंड्यांमध्येही छान दिसतात. त्यांना सहजतेने उगवता येते.

पॉपी - वेगवेगळ्या रंगांची ही फुले दिसायला फार छान दिसतात. तुम्ही तुमच्या कुंडीत यांना सजवू शकता.

फुलांना दररोज सूर्यप्रकाश, थोडीशी ओलसर माती आणि वेळोवेळी खत दिल्यास ते संपूर्ण हिवाळ्यात वेगाने वाढण्यास आणि फुलण्यास मदत करतील.






