बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री जिनिलिया डिसुझा (Genelia D’Souza ) ही सोशल मीडियावर फार ऍक्टिव्ह असते. नवीन प्रोजेक्ट, नवीन फोटो शूट, रील्स तसेच कुटुंबा सोबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करताना पाहायला मिळत आहे.
जिनिलिया डिसुझा हिने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचा साडी मधील काही फोटो शेअर केले आहेत. तिचा साडी मधील हा लुक सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून तिचे चाहते आणि चित्रपट सृष्टीतील अनेक मित्रांनी तिच्या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
जिनिलिया ही अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) ची पत्नी असून दोघेही बॉलिवूड मधील मोस्ट आयडियल कपल म्हणून ओळखले जातात.
जिनिलिया हिने तिच्या करिअरची सुरुवात तुझे मेरी कसम या चित्रपटातून केली होती.







