ठाणे, मुंबई आणि वसई-विरार या तीन शहरांना जोडणारा मुख्य मार्ग म्हणजे घोडबंदर रोड! ठाणेकरांसाठी हा रस्ता तसा परिचयाचा. सकाळ असो वा रात्र येथे वाहनांची येजा आणि गर्दी तर असतेच. पण हे क्षेत्र फार भयानक असे मानले जाते. घनदाट जंगलात असणारा या रस्त्यावर प्राणी ये जा तर करत असतात त्याचबरोबर इथे असते कुणाचे तरी सावट!
रात्री '2:45 AM' वाजता घोडबंदर रोडने प्रवास करताय? सावधान! (फोटो सौजन्य- Social Media)
असे म्हणतात की, "काही वर्षांपूर्वी एका गाडीच्या अपघातामध्ये एका तांत्रिकाचा मृत्यू झाला. मरताना त्याने त्या जागेला श्राप दिला. येथे ज्या कुणाचा अवकाळी मृत्यू होईल तो त्याच्या लिखित मृत्यूच्या दिनांकापर्यंत भटकत राहील."
तेव्हापासून घोडबंदर रोडची प्रत्येक रात्र भयाण दिसू लागली. तेथे स्थानिकांमध्ये एक गोष्ट प्रचलित आहे. ते म्हणतात की 'काही वर्षांपूर्वी यश नावाच्या एक भाजी विक्रेता त्याचा सहकारी अजितबरोबर घोडबंदर रोडने प्रवास करत होता. रात्रीचे अडीच वाजले असतील. त्यावेळी यशला रस्त्यालगत एक स्त्री लिफ्ट मागताना दिसली.
यश गाडी थांबवण्याच्या तयारीत होता. तितक्यात अजितने गाडी थांबवण्यास नकार दिला आणि त्याने त्या तांत्रिकाची गोष्ट त्याला सांगितली. यशला वाटले की अजित काही तरी उगाच फेकत असेल. काही दिवसाने अजितने न सांगता कंपनीमध्ये येणे बंद केले.
काही महिन्यांनी यशने कंपनीच्या मॅनेजरला Call केले आणि अजितबद्दल विचारणा केली. तेव्हा मॅनेजरने त्याचा शोध घेऊन कळवणार असल्याचे सांगितले. त्या रात्री यश घोडबंदर रोडनेच जात होता. भयाण मध्यरात्र होती त्याचवेळी रस्त्यालगत त्याला अजित लिफ्ट मागताना दिसला.
अजितला पाहून यश आनंदित झाला आणि त्याला आतमध्ये येण्यास सांगितले. एरवी खूप बोलणारा अजित शांत कसा काय? असा प्रश्नला आला. गाडीत शांतता होती. अजितचे घर येताच यशने गाडी थांबवली. अजित काही न बोलता गाडीतून उतरून गाडीच्या दिशेने निघून गेला. तितक्यात यशला मॅनेजरचा Call आला आणि यश काही बोलण्याच्या अगोदर मॅनेजर म्हणाला की अजित काही दिवसांगोदर घोडबंदरला एका अपघातात गेला. हे ऐकून यश धावत धावत अजितच्या घराच्या दिशेने गेला. तिथे घरावर टाळा होता त्यामुळे यश पुन्हा धावत धावत गाडीच्या दिशेने आला आणि गाडीमध्ये त्याने अजितला बसलेले पाहिले." अजितने तेव्हा यशला सांगितले की,"म्हणालो होतो... रात्रीच्या वेळी येथे गाडी थांबवू नकोस..."