सकाळच्या नाश्त्यात नेहमीच काय खावं? असे अनेक प्रश्न सगळ्यांचं नेहमी पडतात. नाश्त्यात नेहमीच तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये वेगवेगळ्या पदार्थांचा वापर करून स्मूदी बनवू शकता. स्मूदी आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. सकाळच्या नाश्त्यात स्मूदीचे सेवन केल्यास दीर्घकाळ पोट भरलेले राहते. याशिवाय आरोग्याला सुद्धा अनेक फायदे होतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यात कोणत्या स्मूदीचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या स्मूदीचे सेवन केल्यास वाढलेले वजन कमी होण्यास मदत होईल. याशिवाय लवकर भूक लागणार नाही. (फोटो सौजन्य – iStock)
कडक उन्हाळ्यात सकाळच्या नाश्त्यात करा 'या' हेल्दी स्मूदीचे सेवन
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर आंबे उपलब्ध असतात. आंब्यांपासून बनवलेली स्मूदी आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. यामुळे शरीर कायम थंड राहील.
कलिंगड खाल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. शरीरात वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी नेहमीच कलिंगडच्या स्मूदीचे सेवन तुम्ही करू शकता.
केळी आणि ओट्सच्या मिश्रणापासून बनवलेली स्मूदी वाढलेले वजन कमी करण्यास मदत करेल. याशिवाय या स्मूदीच्या सेवनामुळे पोट भरलेले राहील. लवकर भूक लागणार नाही.
स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी किंवा रास्पबेरी इत्यादी बेरीजचा वापर करून तुम्ही स्मूदी बनवू शकता. यामध्ये दही आणि नारळाचे पाणी घातल्यास स्मूदीची चव अतिशय सुंदर लागेल.
उन्हाळ्यात शरीर कायम हायड्रेट आणि थंड ठेवण्यासाठी अननस आणि नारळाच्या स्मूदीचे सेवन करावे. या स्मूदीच्या सेवनामुळे शरीराला विटामिन सी सुद्धा मिळेल.