जगभरात कॅन्सरसारख्या गंभीर रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. कॅन्सरचे नाव घेतल्यानंतर सुद्धा अनेकांच्या पायाखालची जमीन सरकते. त्यामुळे कॅन्सर सारखा गंभीर आजार होऊ नये, म्हणून आरोग्याची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. दैनंदिन आयुष्यात वापरल्या जाणाऱ्या काही महत्वपूर्ण गोष्टी कॅन्सरचे कारण बनतात. त्यामुळे घरातील काही गोष्टींचा अतिवापर करणे टाळले पाहिजे. आज आम्ही घरातील कोणत्या गोष्टींचा वापर केल्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता असते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. त्यामुळे दैनंदिन वापरात या वस्तूंचा वापर चुकूनही करू नये. केल्यास आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. (फोटो सौजन्य – iStock)
रोजच्या वापरातील 'या' वस्तूंमुळे वाढतो कॅन्सरचा धोका
बाजारातून विकत आणलेले धान्य ठेवण्यासाठी प्लॅस्टिक किंवा इतर कॅनमध्ये साठवून ठेवले जाते. यामुळे शरीरात जळजळ होणे, चक्कर येणे, अशक्तपणा किंवा इतर आजारांचा धोका वाढू लागतो.
नॉनस्टिकच्या भांड्याचा वापर सगळेच करतात. मात्र या भांड्यामध्ये असलेल्या केमिकल घटकांमुळे कॅन्सर, थायरॉईड किंवा यकृताचे आजार होण्याची शक्यता असते.
जेवण गरम ठेवण्यासाठी अनेक लोक ॲल्युमिनियम फॉइलचा वापर करतात. मात्र या ॲल्युमिनियम फॉइलचा वापर आरोग्यासाठी अतिशय धोकादायक आहे. यामुळे अन्नपदार्थांमध्ये बॅक्टरीया वेगाने जातात.
जेवणातील पदार्थ बनवताना रिफाइंड ऑइलचा जास्त वापर केला जातो. ज्यामुळे शरीराचे वजन वाढणे, कोलेस्ट्रॉल आणि इतर आजारांचा धोका वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे जेवणातील पदार्थ बनवताना तेलाचा कमीत कमी वापर करावा.
सगळ्यांच्या घरात प्लॅस्टिकची भांडी मोठ्या प्रमाणात असतात. डबे, कंटेनर, बॉटल, डब्बे किंवा प्लास्टिकच्या इतर अनेक वस्तू वापर केला जातो. मात्र या वस्तूंचा वापर रोजच्या वापरात करू नये. गरम अन्नपदार्थ डब्यात भरल्यामुळे प्लॅस्टिकमध्ये अन्नपदार्थांमधील पोषक घटक शोषले जातात.