मिठाचा वापर जेवणातील प्रत्येक पदार्थामध्ये केला जातो. जेवणात जर मीठ नसेल तर पदार्थाची चवच लागत नाही. जेवणाची चव वाढवण्याचे काम मीठ करते. पण तेच मीठ जर जेवणात नसेल तर जेवणाला काही चवच लागत नाही. पण तुम्ही मिठाचा वापर चहा बनवताना केला आहे का? नसेल केला तर नक्की करून पहा. मिठाचा चहा प्यायल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. दुधाचा चहा पिण्याऐवजी कधीतरी मिठाचा चहा प्यावा. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मिठाचा चहा प्यायल्याने आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
आरोग्यासाठी गुणकारी ठरेल मिठाचा चहा
सकाळी उठल्यानंतर मिठाचा चहा प्यायल्यामुळे बिघड्लेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. तसेच पोटासंबंधित इतर समस्या दूर होतात.
कामाचा थकवा, स्ट्रेस इत्यादी मानसिक तणाव जाणवू लागल्यानंतर मिठाच्या चहाचे सेवन करावे. यामुळे तणाव कमी होऊन आरोग्य सुधारण्यास मदत होईल.
मिठाचा चहा बनवताना तुम्ही आल्याचा सुद्धा वापर करू शकता. आल्यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतील.
मिठाचा चहा बनवण्यासाठी टोपात पाणी गरम करून त्यात अर्धा चमचा चहा पावडर टाकून व्यवस्थित उकळवून घ्या. त्यानंतर चहा गाळून त्यात चिमूटभर मीठ टाकून मिक्स करा. तयार आहे मिठाचा चहा.
हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही.