संध्याकाळच्या वेळी किंवा इतर वेळी छोटी मोठी भूक भागवण्यासाठी मखाणा खाल्ला जातो. मखाणामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, फायबर, लोह, जस्त इत्यादी घटक मोठ्या प्रमणावर आढळून येतात. तसेच यामध्ये कार्बोहायड्रेट्स, फायबर आणि प्रथिने आढळून येतात.मखाणा खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. तसेच हा पदार्थ पचनास हलका आणि चवीला सुद्धा सुंदर लागतो. त्यामुळे रोजच्या आहारात तुम्ही मखाणाचे सेवन करू शकता. आज आम्ही मखाणा खाल्ल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य-istock)
पोषक तत्वांनी समृद्ध असलेला मखाणा खाण्याचे फायदे

अनेकदा सांधेदुखी, अंगदुखी किंवा कंबर दुखीचा त्रास जाणवू लागल्यानंतर मखाणाचे सेवन करावे. तसेच मखाणाची पाने बारीक करून सांधे किंवा गुडघ्यांवर लावल्यास वेदनांपासून आराम मिळतो.

शरीरात वाढलेली रक्तदाबाची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात मखाणाचे सेवन करावे. यामुळे रक्तदाबाची पातळी वाढत नाही. मखाणामध्ये सोडियमचे प्रमाण कमी आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते.

वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात मखाणाचे सेवन करावे. यामध्ये असलेले इथेनॉल शरीरातील फॅट सेल्स नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतात.

100 ग्रॅम माखणामध्ये सुमारे 10.71 ग्रॅम प्रथिने आढळून येतात. ज्यामुळे शरीराला आवश्यक असलेले प्रथिने मिळतात. मखनामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. ज्यामुळे त्वचा सुधारण्यास मदत होते.

हिरड्यांमध्ये आलेली सूज किंवा वेदना होत असल्यास मखाणाचे सेवन करावे. हिरड्यांशी संबंधित जळजळ आणि बॅक्टेरियाच्या प्रभावामुळे होणारा त्रास कमी होतो.






