दिवाळीत हातात पुरेशा बोनस येऊन खुश आहात पण तुम्हाला माहिती आहे का? याच बोनसने देशात अनेक जणांची लाईफ सेट झाली आहे. मुळात, बोनस हा प्रकार सणासुदीच्यावेळी वाढता आर्थिक भार कमी करण्यासाठी आणण्यात आली पण काही कंपन्यांना देवाचा दुसरा अवतार म्हंटले तरी चालेल! कारण त्यांनी बोनस म्हणून असे काही दिले आहे, जे वाचून तुमचे डोळे उघडेच्या उघडे राहणार आहेत.
फोटो सौजन्य - Social Media
हरियाणातील MITs kind Healthcare कंपनीने आपल्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 15 कार भेट दिल्या, ज्यामध्ये 2 Maruti Grand Vitara आणि 13 Tata Punch गाड्यांचा समावेश आहे.
चेन्नईतील Team Detailing Solutions कंपनीने 28 कार आणि 29 बाईक/स्कूटर कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून दिल्या; यात Mercedes, Hyundai, Maruti Suzuki, Tata यांसारख्या ब्रँडच्या गाड्या होत्या.
तमिळनाडूतील कोटागिरी येथील चहाच्या मळ्यात मालकाने 15 कर्मचाऱ्यांना त्यांची आवडती Royal Enfield बाईक (₹2 लाखांहून अधिक किंमतीची) भेट दिली आणि सर्वांना जॉय राईडवर नेले.
सूरतचे हरे कृष्णा एक्सपोर्ट्सचे डायमंड व्यापारी सव्र्हजी ढोलकिया यांनी कर्मचाऱ्यांना 400 फ्लॅट्स दिले, प्रत्येक फ्लॅट 1,100 चौ.फुटांचा आहे आणि सवलतीच्या डाऊन पेमेंटसह देण्यात आला. या व्यतिरिक्त, ढोलकिया यांच्या कंपनीने कामगिरीच्या आधारे कर्मचाऱ्यांना 1,260 गाड्या एका वर्षात दिल्या होत्या.
चेन्नईतील Challani Jewellery ने 8 कार आणि 18 बाईक कर्मचाऱ्यांना दिल्या, ज्यांची एकूण किंमत सुमारे ₹1.2 कोटी होती.