बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. तिचा स्त्री २ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. आतापर्यत स्त्री २ या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर ४५० कोटींहून अधिक कमाई केली आहे. शक्ती कपूरची मुलगी श्रद्धा कपूर ही चित्रपटांसाठी लकी चार्म आहे असे म्हंटले जात आहे. श्रद्धा कपूरचे तिच्या करियरमध्ये अनेक दमदार बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. यामध्ये श्रद्धा कपूरच्या कोणत्या सिनेमांनी किती कमाई केली आहे यावर एकदा नजर टाका.
श्रद्धा कपूरच्या कोणत्या सिनेमांनी किती कमाई केली आहे यावर एकदा नजर टाका. फोटो सौजन्य - सोशल मीडिया

आशिकी २ - बॉलीवूडचा सर्वाधिक आवडता सिनेमा आशिकी हा ९० च्या काळामध्ये तयार करण्यात आला होता, त्यानंतर आशिकी २ मध्ये कोण असणार असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. आशिकी २ सिनेमा गृहांमध्ये आल्यानंतर प्रेक्षकांनी चित्रपटाला भरभरून प्रेम दिले होते. या चित्रपटाने १०९ कोटींची कमाई केली होती.

एक विलन - २०१४ मध्ये प्रदर्शित झालेला एक विलन या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली होती. त्याचबरोबर रितेश देशमुखच्या खलनायक भूमिकेला सुद्धा प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते.

स्त्री - स्त्री चित्रपटामधील श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची वाहवाह मिळाली. या चित्रपटाच्या पहिल्या भागाने १२९.८३ कोटींची कमाई केली होती.

साहो - साऊथ सिनेमाचा सुपरस्टार प्रभाससोबतचा साहो चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. या चित्रपटाने सिनेमा गृहांमध्ये १४५.६७ कोटींची कमाई केली आहे.

चिंचोरे - सुशांत सिंहचा शेवटचा सिनेमा चिंचोरेमध्ये श्रद्धा कपूरने दमदार अभिनय केले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १५३.१६ कोटींची कमाई केली होती. त्याचबरोबर यामध्ये सुशांत सिंह आणि श्रद्धा कपूर यांची प्रेक्षकांनी जोडी आवडली होती.

तू झुठी मैं मकर - २०२३ मध्ये प्रदर्शित झालेला तू झुठी मैं मकर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. या चित्रपटाने १४७.२८ कोटींची कमाई केली होती.

स्त्री २ - स्त्री २ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहेत, या चित्रपटाने आतापर्यत ४५० हुन अधिक कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने अनेक विक्रमही मोडले आहेत.






