उन्हाळ्यात शरीरात वाढलेली उष्णता नियंत्रणात ठेवण्यासाठी वेगवेगळ्या थंड पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. या दिवसांमध्ये प्रामुख्याने कलिंगडचे सेवन केले जाते. कलिंगडमध्ये असलेले पाणी शरीरात ओलावा कायम टिकवून ठेवतात. याशिवाय उन्हाळ्यात जास्त बाहेर फिरून आल्यानंतर त्वचा अधिक कोरडी आणि काळी पडून जाते. अशावेळी काळवंडलेली त्वचा सुधारण्यासाठी अनेक महिला क्रिम्सचा वापर करतात. मात्र क्रीम्सचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करावे. काळवंडलेली त्वचा सुधारण्यासाठी कलिंगडच्या रसात हे पदार्थ मिक्स करून चेहऱ्यावर लावावे. (फोटो सौजन्य – iStock)
उन्हाळ्यात त्वचा आणि आरोग्यासाठी प्रभावी ठरेल कलिंगड!
उन्हाळ्यात शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी दह्याचे सेवन केले जाते. दही त्वचेला लावल्यास त्वचेमध्ये अनेक बदल दिसून येतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचा कोरडी झाल्यास दही आणि कलिंगडचा फेसपॅक लावावा.
कलिंगड आणि गुलाब पाण्याचे मिश्रण मिक्स करून चेहऱ्यावर लावल्यास त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार होईल. त्वचेमध्ये वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी गुलाब पाणी लावावे.
कोरफडच्या रसात कलिंगडचा रस टाकून मिक्स करून घ्या. त्यानंतर तयार केलेले मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसेच ठेवा. नंतर हलक्या हाताने चेहरा मसाज करा. ५ मिनिटं फेसपॅक तसाच ठेवून नंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या.
कलिंगडच्या रसात मध मिक्स करून त्वचेवर लावल्यास त्वचा अधिक उजळदार आणि सुंदर होईल. तयार केलेला फेसपॅक त्वचेवर लावून १५ ते २० मिनिटं ठेवून नंतर पाण्याने त्वचा स्वच्छ धुवून घ्या. यामुळे त्वचेवरील डाग कमी होतील.
मागील अनेक वर्षांपासून त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी बेसनचा वापर केला जात आहे. वाटीमध्ये कलिंगडचा रस घेऊन त्यात चमचाभर बेसन टाकून मिक्स करा. तयार फेसपॅक त्वचेवर लावून काहीवेळ तसाच ठेवा. यामुळे त्वचा डागविरहित आणि चमकदार होईल.