मुंबईत लोकल ट्रेनसाठी मुंबईकरांच्या मनात एक आगळा वेगळा जिव्हाळा आहे. हा जिव्हाळा Life Line म्हणून ओळखला जातो. ९ जून २०२५ रोजी मुंब्रा रेल्वेस्थानकाजवळ घडलेल्या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. अशात मुंबईची लाईफलाईन डेथलाईन बनत चालली आहे का? असा सवाल लाखो मुंबैकऱ्यांच्या मनामध्ये तयार झाला आहे. पण, तुम्हाला माहिती आहे का? या Local Train चा पाया कसा रचला गेला? चला तर मग जाणून घेऊयात... मुंबई लोकल ट्रेनचा रंजक इतिहास.
कसा रचला गेला मुंबई लोकल ट्रेनचा पाया? जाणून घ्या संपूर्ण इतिहास
16 एप्रिल 1853 रोजी भारतातील पहिली प्रवासी रेल्वे मुंबई (बोरीबंदर) ते ठाणे या मार्गावर सुरू झाली. 34 किमी अंतराच्या या प्रवासासाठी सुमारे 400 प्रवासी होते. ब्रिटिशांनी व्यापार, प्रशासन व सैनिकी कारणांसाठी रेल्वे व्यवस्था विकसित केली. यामुळे मुंबई एक महत्त्वाचे बंदर आणि औद्योगिक केंद्र म्हणून विकसित झाले.
१९व्या शतकाच्या उत्तरार्धात मुंबईची लोकसंख्या वेगाने वाढत होती. कामगार वर्गासाठी शहरात येण्या-जाण्याची सोय हवी होती. यामुळे उपनगरी रेल्वेची गरज निर्माण झाली. १९२५ मध्ये पहिली इलेक्ट्रिक लोकल ट्रेन कुर्ला ते सायन मार्गावर धावली. यामुळे लोकल ट्रेन सेवेचा विस्तार जलद झाला.
सध्या मुंबईत मध्य, पश्चिम आणि हार्बर असे तीन मुख्य उपनगरी मार्ग आहेत. प्रत्येक मार्गावर लाखो प्रवासी दररोज प्रवास करतात.
मुंबई लोकलमध्ये आता डिजिटल तिकिटिंग, मेगा ब्लॉक्सद्वारे सुधारणा, आणि नव्या उपनगरी जोडण्या (उदा. ठाणे-वाईकल मार्ग) यामुळे ही सेवा अधिक प्रभावी आणि आधुनिक होत आहे.
मुंब्रा येथे घडलेल्या दुर्घटनेमुळे मुंबई लोकल ट्रेनबद्दलच्या सुधारणेबाबत अनेक निर्णय घेण्यात येत आहेत. ऑटोमॅटिक दरवाजा बंद होण्याचे तंत्र विकसित होण्याची शक्यता आहे. लोकल ट्रेनच्या फेऱ्यांमध्ये वाढ करावी अशी मागणी करण्यात आली आहे.