ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये अनेक दिग्गज खेळाडू ज्यांनी त्यांचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजवले आहे. यामध्ये त्यांचा कर्णधार पॅट कमिन्स याचे नाव अव्वल स्थानावर येते. ऑस्ट्रेलियन संघामध्ये फक्त फलंदाजी मध्येच नाही ते गोलंदाजीमध्ये अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाचे कसोटी क्रिकेटच्या रँकिंगमध्ये टॉप 10 च्या शर्यतीत पाच गोलंदाज आहेत यांची यादी वाचा.
कसोटी क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर टाॅप १० च्या शर्यतीत असलेले गोलंदाज.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स हा कसोटी क्रिकेटच्या आयसीसी रँकिंगमध्ये तिसरा क्रमांकावर आहे. त्याने त्याचा नेतृत्वाखाली संघाला एका नव्या उंचीवर पोहोचवले आहे. त्याचबरोबर तो त्याच्या गोलंदाजीने नाही त्याचबरोबर फलंदाजीने देखील आणि गोलंदाजीने अडचणीतून बऱ्याच वेळा बाहेर काढला आहे. फोटो सौजन्य - X
आंतरराष्ट्रीय क्रिकेट कसोटी रांकिंग मध्ये चौथ्या स्थानावर जोश हेजलवूड हा आहे. त्याने त्याचा गोलंदाजीने आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट चाहत्यांना प्रभावित केले आहे. आयपीएलमध्ये देखील त्याने आरसीबीसाठी चांगली कामगिरी केली होती. फोटो सौजन्य - X
आयसीसी रँकिंगमध्ये बोलँड हा कसोटी क्रमवारी मध्ये सहाव्या स्थानावर आहे. त्याला संघामध्ये फार जास्त संघासाठी स्थान मिळाले नाही पण नॅथन लिओनच्या जागेवर त्याला झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात जागा मिळाली होती. फोटो सौजन्य - X
ऑस्ट्रेलियन दिग्गज फिरकीपट्टू नॅथन लिओन हा दुखापतीमुळे सध्या संघाबाहेर आहे. पण त्याने त्याच्या कामगिरीने मागील अनेक वर्ष क्रिकेट चाहत्याचे मनोरंजन केले आहे. तो ऐसीजी क्रमावारी मध्ये सध्या आठव्या स्थानावर आहे. फोटो सौजन्य - X
आयसीसी टॉप 10 च्या कसोटी रँकिंग मध्ये ऑस्ट्रेलियाचा पाचवा खेळाडू हा मिचेल स्टार्क आहे. मिचेल स्टार्क हा टॉप 10 मध्ये दहाव्या स्थानावर आहे. या स्टार्क ऑस्ट्रेलिया दिग्गज गोलंदाजांच्या यादीमध्ये गणला जातो. फोटो सौजन्य - X