रोजच्या आहारात अनेक वेगवेगळ्या भाज्या आणि फळांचे सेवन केले जाते. मात्र चुकीच्या पद्धतीने भाज्या आणि फळांचे सेवन केल्यास शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. बाजारातून भाज्या फळे विकत आणल्यानंतर ते स्वच्छ करून फ्रिजमध्ये किंवा पेंट्रीमध्ये ठेवल्या जातात. पण फ्रिजमध्ये ठेवलेल्या भाज्या खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. यामुळे पदार्थांमधील आवश्यक पोषक घटक नष्ट होतात. ज्यामुळे शरीराला हानी पोहचते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोणते पदार्थ चुकीच्या पद्धतीने खाल्यास शरीरात विष तयार होण्याची शक्यता असते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)
'हे' पदार्थ योग्य पद्धतीने न खाल्ल्यास शरीरासाठी ठरतील विष
फळे भाज्या पिकवताना कीटक नाशकांचा वापर केला जातो. त्यामुळे स्ट्रॉबेरी बाजारातून आणल्यानंतर व्यवस्थित धुवून खावीत. स्ट्रॉबेरी अशीच खाल्यास आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
राजमा खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. राजमा आणि भात हे कॉम्बिनेशन सगळ्यांचे आवडते आहे. बीन्समध्ये हेमॅग्लुटिनिन असते, त्यामुळे पोटासंबंधित समस्या उद्भवू शकतात. यामुळे राजमा शिजवताना आधी काही तासांसाठी भिजत ठेवावा.
बटाट्याची रोप वाढवताना त्यावर कीटकनाशके किंवा जंतुनाक्षकांचा वापर केला जातो. त्यामुळे बटाटे स्वच्छ धुवून घ्यावेत. तशीच भाजी किंवा इतर पदार्थांमध्ये बटाटा टाकताना त्याच्या वरील साल काढून घ्यावी.
शरीरासाठी गुणकारी असलेले गाजर केळ्यांसोबत ठेवल्यास दोन्ही पदार्थांची चव बिघडू शकते. केळीतून बाहेर पडणारा इथिलीन वायू गाजरांमध्ये असलेल्या रसायनांमध्ये बदलून जातो.
बऱ्याचदा रात्रीच्या वेळी झोप न आल्यामुळे अनेक लोक दुधात किंवा पाण्यात जायफळ पावडर टाकून पितात. जास्त प्रमाणात खाण्यापूर्वी काळजी घ्या. जास्त प्रमाणात खाल्यास मतिभ्रम होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.