फोटो सौजन्य: Pinterest
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीने त्यांच्या ईल SUV Volvo EX 30 मध्ये खराबी आढळल्यानंतर रिकॉल जारी केला आहे. या एसयूव्हीमध्ये कोणता बिघाड झाला आहे? यामुळे किती युनिट्स प्रभावित झाले आहेत आणि भारतात देखील रिकॉल जारी करण्यात आला आहे का? या सर्व प्रश्नाची उत्तरे जाणून घेऊयात.
Test Drive दरम्यान Accident झाला तर खिशातून पैसे द्यावे लागतात का? जाणून घ्या काय सांगतात नियम
मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्होल्वोच्या इलेक्ट्रिक एसयूव्ही, EX 30 मध्ये एक खराबी आढळून आली आहे. त्यानंतर, कंपनीने या एसयूव्हीसाठी रिकॉल जारी केले आहे.
कंपनीकडून सुमारे 40,323 युनिट्ससाठी रिकॉल जाहीर करण्यात आला आहे. या सर्व युनिट्स सिंगल मोटर एक्स्टेंडेड रेंज आणि ट्विन मोटर परफॉर्मन्स व्हेरिएंटमधील आहेत. या वाहनांमध्ये आग लागण्याचा संभाव्य धोका असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
रिकॉल जाहीर करताना कंपनीने वाहनधारकांना काही सूचना दिल्या आहेत. समस्या पूर्णपणे दूर होईपर्यंत कार उघड्या जागेत पार्क कराव्यात आणि चार्जिंग करताना एसयूव्हीला 70 टक्क्यांपेक्षा जास्त चार्ज करू नये, असा सल्ला देण्यात आला आहे.
सध्या हा रिकॉल भारतातील वाहनांसाठी लागू करण्यात आलेला नाही. सियाम (SIAM) च्या अधिकृत पोर्टलवरही यासंदर्भात कोणतीही माहिती अद्याप अपडेट करण्यात आलेली नाही.
Volvo Cars कंपनीकडून प्रभावित युनिट्स असलेल्या सर्व ग्राहकांना ई-मेल, फोन कॉल आणि मेसेजद्वारे थेट माहिती दिली जात आहे.
ज्या वाहनधारकांना रिकॉलसंदर्भात कळविण्यात आले आहे, त्यांनी आपली कार जवळच्या अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्ये तपासणीसाठी घेऊन जावे. तपासणीत खराबी आढळल्यास संबंधित पार्ट कोणताही अतिरिक्त शुल्क न आकारता बदलून दिला जाणार आहे. अहवालांनुसार, एसयूव्हीची बॅटरी जास्त गरम होऊ शकते, ज्यामुळे आगीचा धोका वाढू शकतो.






