वाढत्या उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी नियमित भरपूर पिणे आवश्यक आहे. पाण्याच्या सेवनामुळे शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात. यासोबतच उन्हाळा वाढली की सगळ्यांचं थंड पेय पिण्याची इच्छा होते. अशावेळी कोल्ड्रिंक, ताक, दही इत्यादी पदार्थांचे सेवन करण्यास जास्त प्राधान्य दिले जाते. मात्र नेहमी नेहमी कोल्ड्रिंक पिणे लहान मुलांच्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. अशावेळी लहान मुलांना नियमित या फळांपासुन बनवलेल्या रसाचे सेवन करावे. फळांच्या रसाचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे.यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. (फोटो सौजन्य – iStock)
वाढत्या गर्मीमध्ये लहान मुलांना कोल्ड्रिंक देण्याऐवजी नियमित पिण्यास द्यावीत 'ही' गुणकारी पेय
शरीराच्या कमी झालेल्या पांढऱ्या पेशी वाढवण्यासाठी किवीच्या रसाचे सेवन करावे. किवींचा रस प्याल्यामुळे आरोग्यासह त्वचेला अनेक फायदे होतात. लहान मुलांना कोणत्याही फळांचा रस देताना नेहमी ताजा रस द्यावा.
उन्हाळ्यात कोल्ड्रिंक पिण्याऐवजी द्राक्षांचा रस प्यावा. यामध्ये विटामिन सी अधिक प्रमाणात आढळून येते. याशिवाय या रसाचे नियमित सेवन केल्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते.
पपईमध्ये पपेन नावाचे एंजाइम बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी फायदेशीर ठरते. यामध्ये आढळून येणारे विटामिन सी आणि फायबर शरीरासाठी आवश्यक आहे. पपईचा रस प्यायल्यामुळे लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती सुधारते.
वाढत्या उन्हात कलिंगड खाण्यास जास्त प्राधान्य दिले जाते. कलिंगड खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. कलिंगडमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे उन्हाळ्यात लहान मुलांना कलिंगडचा रस पिण्यास द्यावा.
उन्हाळ्यामध्ये शरीराला पाण्याची जास्त आवश्यकता असते. त्यामुळे लहान मुलांना नियमित संत्र्याचा रस पिण्यास द्यावा. संत्र्याच्या रसात असलेले विटामिन सी आरोग्यासह त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे.