सणावाराच्या दिवसांमध्ये अतिप्रमाणात गोड पदार्थांचे सेवन केले जाते. गोड पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. शरीरात साखरेचे प्रमाण वाढू लागते, तर अनेकदा पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. अशावेळी शरीर डिटॉक्स करणे आवश्यक आहे. शरीर डिटॉक्स केल्यामुळे किडनीमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ होते., याशिवाय शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडून जातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला गोड पदार्थांच्या अतिसेवन केल्यानंतर शरीर डिटॉक्स करण्यासाठी कोणत्या डिटॉक्स पेयांचे सेवन करावे, जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य – iStock)
गोड पदार्थांच्या सेवनानंतर शरीर डिटॉक्स करण्यासाठी आहारात करा 'या' प्रभावी पेयांचे सेवन
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात कलिंगड मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. कलिंगड खाल्यानंतर शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते. याशिवाय पुदिन्यामध्ये असलेले घटक शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करतात.
आल्यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म, अँटिऑक्सिडंट शरीरातील टाकाऊ घटक बाहेर पडून जातात. आल्याच्या पाण्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते. तर हळदीमधील गुणधर्ममुळे यकृत विषमुक्त होते.
ककाडी पुदिन्याचे पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहते. शरीरातील उष्णता कमी होऊन शरीरात थंडावा निर्माण होतो. काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. या पाण्याच्या सेवनामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात आणि त्वचा निरोगी चमकदार राहते.
अनेक लोक सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी ग्रीन टी चे सेवन करतात. ग्रीन टी च्या सेवनामुळे शरीरातील फ्री रॅडिकल्स बाहेर निघून जातात आणि चयापचय सुधारते. शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी ग्रीन टी प्यावी.
शरीर डिटॉक्स करण्यासाठी लिंबू आणि मधाच्या पाण्याचे एकत्र सेवन करावे. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडून जातात. लिंबामध्ये विटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात आढळून येतात, ज्याचे सेवन केल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.