त्वचेसाठी सर्वच विटामिन आवश्यक असतात. मात्र शरीरात विटामीनची कमतरता निर्माण झाल्यानंतर त्वचेमध्ये अनेक बदल दिसून येतात. चेहरा सुंदर दिसण्यासाठी हायल्यूरॉनिक अॅसिड अतिशय महत्वाचे आहे. हायल्यूरॉनिक अॅसिड त्वचा मऊ आणि उजळदार करण्यासाठी आवश्यक आहे. याशिवाय त्वचा उजळदार करण्यासाठी हायल्यूरॉनिक अॅसिड फायद्याचे आहे. हायल्यूरॉनिक अॅसिड त्वचेमधील ओलावा कायम टिकवून ठेवण्यासाठी मदत करते. हे एक मॉइश्चरायझर आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हायल्यूरॉनिक अॅसिड युक्त कोणत्या पदार्थांचे आहारात सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – iStock)
दैनंदिन आहारात करा 'या' Hyaluronic Acid युक्त पदार्थांचे नियमित सेवन
चवीला आंबट गोड असलेला टोमॅटो जेवणातील पदार्थांची चव वाढवतो. याशिवाय टोमॅटोचा वापर त्वचेसाठी केल्यामुळे चेहरा अधिक चमकदार आणि स्वच्छ होतो.
गाजरमध्ये बीटा-कॅरोटीन आणि विटामिन ए, सी इत्यादी अनेक घटक आढळून येतात. त्यामुळे जेवणात तुम्ही सॅलड म्हणून गाजर खाऊ शकता. गाजर खाल्यामुळे त्वचा हायड्रेट राहते.
संत्री, लिंबू, गोड लिंबू, मोसंबी, द्राक्ष इत्यादी आंबट पदार्थांचे रोजच्या आहारात सेवन करावे. यामुळे त्वचेवरील डाग कमी होऊन त्वचा सुंदर आणि डागविरहित दिसू लागते.
बटाट्याचा वापर रोजच्या जेवणातील पदार्थांमध्ये केला जातो. यामध्ये विटामिन ए आणि मॅग्नेशियम इत्यादी अनेक घटक आढळून येतात. यामुळे शरीरातील हायलुरोनिक ऍसिडची पातळी वाढते.
रोजच्या आहारात सोया युक्त पदार्थांचे सेवन केल्यास त्वचेला अनेक फायदे होतात. सोया मिल्क, टोफू आणि सोयाबीन इत्यादी पदार्थांचे रोजच्या आहारात सेवन करावे. यामुळे त्वचा मऊ आणि सुंदर होते.