भारताच्या संघाने दुसऱ्या कसोटीमध्ये विजय मिळवल्यानंतर आता तिसरा सामना हा भारताचा लॉर्ड्स मैदानावर खेळवला जाणार आहे. लॉर्ड्स मैदान हे इंग्लंडमधील एक ऐतिहासिक मैदान आहे. पुढील सामना हा या मैदानावर खेळवला जाणार आहे याआधी बीसीसीआयने भारतीय खेळाडूंचे काही खास क्षण टिपले आहेत यावर नजर टाका.
भारतीय संघाचे बीसीसीआयने शेअर केलेले काही खास फोटो. फोटो सौजन्य – X (BCCI)
यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी दुसऱ्या कसोटीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. दोघांनाही चांगली संघाला सुरुवात करून दिली आणि भारताच्या संघाला विजय मिळवण्यात मोलाचे योगदान केले या तिसऱ्या कसोटीमध्ये हे दोन्ही फलंदाज कसे कामगिरी करतात याकडे चाहत्यांचे लक्ष असणार आहे. फोटो सौजन्य - BCCI
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सुरू होणाऱ्या तिसऱ्या सामन्यासाठी पहिल्या सामन्यांमध्ये त्याचबरोबर दुसरे सामन्यामध्ये भारतीय संघाची फलंदाजी ही अविश्वसनीय राहिली. ऋषभ पंत याने भारतीय संघासाठी महिल्या सामन्यात चांगली कामगिरी केली त्याने दोन्ही डावामध्ये शतक झळकावले होते पण टीम इंडीयाचा या सामन्यात पराभव झाला होता. फोटो सौजन्य - BCCI
नितीश कुमार रेड्डी ला दुसरा सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती पण तो दोन्ही सामन्यात फार काही विशेष कामगिरी करू शकला नाही त्यामुळे त्याच्या जागेवर तिसऱ्या सामन्यांमध्ये कोणाला संधी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नितेश कुमार रेड्डी याला साई सुदर्शनच्या जागेवर स्थान मिळाले होते. रविद्र जडेजा याने दुसऱ्या सामन्यात दोन्ही डावामध्ये धुव्वादार खेळ दाखवला. फोटो सौजन्य - BCCI
दुसऱ्या सामन्यामध्ये जसप्रीत बुमराहला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले नव्हते लॉर्ड्समध्ये तिसऱ्या कसोटीमध्ये त्याचे पुनरागमन होणार आहे असे कर्णधाराने आधीच सांगितले आहे. फोटो सौजन्य - BCCI
वेगवान गोलंदाज आकाशदीप याने जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत भारतीय संघासाठी कमालीची कामगिरी केली आणि दहा विकेट्स नावावर केले. त्याचबरोबर मोहम्मद सिराज याने भारतीय संघाचा दुसऱ्या कसोटीमध्ये 7 विकेट्स घेतले आहेत. भारतीय संघाचे प्लेइंग 11 मध्ये कसे बदल होणार हे पाहणे मनोरंजक ठरेल. फोटो सौजन्य - BCCI
दोन सामने पार पडले आहेत पण दोन्ही सामन्यांमध्ये कुलदीप यादव आणि अर्शदीप सिंहला खेळण्याची संधी मिळाली नाही पुढील सामन्यांमध्ये त्याला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. फोटो सौजन्य - BCCI