भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये विश्वचषकाआधी भारतीय संघाची महत्वाची मालिकेचा 11 जानेवारी रोजी शुभारंभ होणार आहे. दोन्ही संघासाठी ही मालिका महत्वाची असणार आहे. या मालिकेमध्ये पहिले तीन सामने हे एकदिवसीय मालिकेचे आयोजित केले आहेत, तर त्यानंतर पाच टी20 सामने खेळवले जाणार आहेत. या दोन्ही संघाची हेड टू हेड आकडेवारीवर एकदा नजर टाका.
भारत न्यूझीलंडची हेड टू हेड आकडेवारी. फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिकेला उद्या, रविवारपासून सुरुवात होत आहे. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना बडोदा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया

दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडलेला कर्णधार शुभमन गिल पुनरागमन करत आहे. भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी उत्साहवर्धक गोष्ट म्हणजे ते पुन्हा एकदा मैदानावर रो-को, म्हणजेच रोहित शर्मा आणि विराट कोहलीची चमक पाहतील. फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत रोहित आणि विराटने उत्कृष्ट कामगिरी केली. ऑस्ट्रेलिया मालिकेत रोहित सर्वोत्तम खेळाडू होता, तर दक्षिण आफ्रिका मालिकेत विराट सर्वोत्तम खेळाडू होता. फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया

भारत आणि न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत १२० एकदिवसीय सामने खेळले आहेत. भारतीय संघाचा वरचष्मा आहे. टीम इंडियाने ६२ सामने जिंकले आहेत, तर न्यूझीलंडने ५० सामने जिंकले आहेत. एक सामना बरोबरीत सुटला आहे, तर सात सामने अनिर्णित राहिले आहेत. गेल्या सहा एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे. फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया

खेळपट्टी गोलंदाजांना फारशी मदत करणार नाही आणि चेंडू जुना होत असताना फिरकीपटूंना थोडासा फायदा होऊ शकतो. रविवारी वडोदरामध्ये कमाल तापमान २९° सेल्सिअस आणि किमान तापमान १४° सेल्सिअस राहण्याची अपेक्षा आहे. नाणेफेक दुपारी १ वाजता होईल आणि सामना दुपारी १:३० वाजता सुरू होईल. फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया






