क्रिकेटमध्ये अनेक विक्रम इतिहासामध्ये नोंदवण्यात आले आहेत, टी20 क्रिकेटमध्ये बऱ्याचदा धावांचा पाऊस पाहायला मिळतो. भारताचा स्टार फलंदाज युवराज सिंग याने त्याच्या कठीण काळामध्ये देखील भारताला विश्वचषक जिंकुन दिला होता. त्याचबरोबर त्याने त्याच्या करिअरमध्ये सहा षटकारांचा विक्रम नावावर केला होता, त्याचे हे सहा षटकार अजुनही क्रिकेट चाहत्यांच्या लक्षात आहेत. आतापर्यत कोणत्या खेळाडूंनी षटकार ठोकले आहेत यावर एकदा नजर टाका.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग षटकार ठोकणारे फलंदाज. फोटो सौजन्य – X
भारताचा माजी स्टार फलंदाज युवराज सिंह याने 2007 मध्ये इंग्लजविरुद्ध एकाच ओव्हरमध्ये सहा षटकार ठोकले होते. त्याचा हा विक्रम कोणत्याही फलंदाजाने आतापर्यत मोडला नाही. फोटो सौजन्य – X
या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे, वेस्ट इंडीजचा कायरन पोलार्ड आहे. त्याने सलग 6 षटकार 2021 मध्ये मारले होते. कायरन पोलार्डने श्रीलंकाविरुद्ध 6 षटकार मारले होते. फोटो सौजन्य – X
तिसऱ्या स्थानावर नेपाळचा फलंदाज दीपेंद्र सिंग ऐरी याने सलग सहा षटकार मारले होते. त्याने मगोलिया संघाच्या विरुद्ध हा पराक्रम 2023 मध्ये केला होता. चौथ्या स्थानावर नेपाळचा फलंदाज दीपेंद्र सिंग ऐरी हाच आहे, त्याने हा विक्रम एकदा नाही तर दोनदा केला आहे. दुसऱ्यांदा त्याने हा विक्रम कतारविरुद्ध केला आहे. फोटो सौजन्य – X
पाचव्या स्थानावर भारताचा संजु सॅमसन आहे, त्याने हा विक्रम 2024 मध्ये केला होता. त्याने सलग ५ षटटकार मारले होते हा विक्रम त्याने बांग्लादेश विरुद्ध केला होता. फोटो सौजन्य – X
सहाव्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचा डेविड मिलर आहे त्याने बांग्लादेश विरुद्ध 5 षटकारांचा विक्रम केला होता. हा विक्रम त्याने 2017 मध्ये केला होता. फोटो सौजन्य – X