साखरेचा वापर न करता नैवेद्यासाठी बनवा घट्टसर शेवयांची खीर, गुळामुळे वाढेल पदार्थाची खमंग चव
जेवणाच्या ताटात प्रत्येकाला काहींना काही गोड पदार्थ खाण्यास हवा असतो. मिठाई, शेवयांची खीर, बासुंदी, गुलाबजाम इत्यादी ठराविक पदार्थ कायमच बनवले जातात. पण वारंवार साखरेचा वापर करून बनवलेले गोड पदार्थ खाल्ल्यास शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. सतत गोड पदार्थ खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते आणि शरीरात असंख्य बदक जाणवू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला गुळाचा वापर करून शेवयांची खीर बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. मधुमेह किंवा आरोग्यासंबंधित कोणत्याहीसमस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांनी गूळ फायदेशीर ठरते. गूळ खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित राहते आणि शरीराला अजिबात हानी पोहचत नाही. गुळामध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम इत्यादी अनेक घटक आढळून येतात. त्यामुळे शरीरात निर्माण झालेली पोषणाची कमतरता भरून काढण्यासाठी गूळ खावे. चला तर जाणून घेऊया गुळाची खीर बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)






